Gautam Adani: गौतम अदानींची रेल्वे क्षेत्रात एन्ट्री, अदानी समूह खरेदी करणार 'ट्रेनमॅन' प्लॅटफॉर्म, अशी आहे डील

अदानी समूह आता रेल्वे क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniSakal
Updated on

Gautam Adani: अदानी समूह आता रेल्वे क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. अदानी एंटरप्रायझेस लवकरच ट्रेन तिकिटांची ऑनलाइन विक्री करणार आहे.

अदानी एंटरप्रायझेसने शुक्रवारी (16 जून) स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली. कंपनीने माहिती दिली की ती स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) मधील 100% स्टेक घेणार आहे.

अदानी एंटरप्रायझेसने माहिती दिली की, 'अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड (ADL) ने स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड मधील 100% स्टेकच्या प्रस्तावित अधिग्रहणासंदर्भात शेअर खरेदी करार (SPA) वर स्वाक्षरी केली आहे.'

मात्र, दोन्ही कंपन्यांमध्ये हा करार किती रुपयांची झाली आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अदानी डिजिटल लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ही अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी आहे.

स्टार्क एंटरप्रायझेस 'ट्रेनमॅन' म्हणूनही ओळखले जाते

स्टार्क एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड 'ट्रेनमॅन' म्हणूनही ओळखले जाते. गुरुग्राम स्थित स्टार्क एंटरप्रायझेस कार्यरत आहे. IIT-रुड़की पदवीधर विनीत चिरानिया आणि करण कुमार हे ट्रेनमॅनचे संस्थापक आहेत. हे भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) अधिकृत ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्ट-अप आहे.

या ऑल-इन-वन ट्रेन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मद्वारे ट्रेन तिकीट बुक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही पीएनआर स्टेटस, कोचची स्थिती, ट्रेनचे लाइव स्टेटस आणि सीट उपलब्धता यासारखी माहिती देखील मिळवू शकता.

Gautam Adani
बँकेत खाते नसताना रामदेव बाबांना 'पतंजली'साठी कर्ज आणि बेट गिफ्ट देणाऱ्या सुनीता पोद्दार आहेत तरी कोण?

ट्रेनमॅन काय आहे ?

गुरुग्राम येथील स्टार्क एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड (SEPL) कंपनी ट्रेनमॅन ही IRCTC अधिकृत ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंग स्टार्टअप आहे. SEPL ची स्थापना विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी केली होती. कंपनीने नुकतेच गुडवॉटर कॅपिटल, हेम एंजल्स आणि इतरांसह यूएस गुंतवणूकदारांच्या संघाकडून 1 दशलक्ष डॉलर निधी उभारला आहे.

अदानी समूहासाठी हा व्यवहार महत्त्वाचा मानला जातो कारण यूएस-स्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने जानेवारीमध्ये अदानी समूहाविरुद्ध अहवाल जारी केला होता, ज्यामुळे समूहाला मोठा धक्का बसला होता.

अदानी समूहाने हिंडेनबर्गचे सर्व दावे नाकारले. पण, अदानी समूहाने व्यवसाय विस्तार आणि अधिग्रहण योजना पुढे ढकलल्या होत्या. त्यामुळे समूहाने पेट्रोकेमिकल्समध्ये विस्तार करण्याची आणि मुंद्रा येथे कोळसा-ते-पॉलीविनाइल क्लोराईड प्रकल्प उभारण्याची योजना रद्द केली होती.

Gautam Adani
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.