India GDP: यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.2 टक्के राहणार - Govt data

जीडीपीत यंदाच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
India GDP
India GDPSakal
Updated on

नवी दिल्ली : भारताचा सध्याच्या GDP मध्ये यंदाच्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं या आर्थिक वर्षात भारताचा रिअल जीडीपी हा ८.२ टक्के राहिलं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. (GDP grows 8.2 per cent in 2023-24 against 7 per cent expansion in FY23 says Govt data)

अर्थव्यवस्थेच्या या ताज्या डेटावरुन हे स्पष्ट होतंय की, जागतीक स्तरावरील आर्थिक आव्हानांचा सामना करतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेनं अर्थतज्ज्ञांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

India GDP
Pandharpur Secret Cellars: पंढरपुरातील मंदिरात सापडलं तळघरं; काय आहे तळघरात जाणून घ्या?

दरम्यान, याच काळात गेल्यावर्षी जीडीपीची वाढ ही ६.१ टक्के होती तर गेल्या तिमाहित ती ८.४ टक्के इतकी होती. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेनं यंदाच्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित जीडीपी वाढीचा दर हा ६.९ टक्के राहिल असा अंदाज वर्तवला होता. तर संपूर्ण वर्षात तो ७.६ टक्के वर्तवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.