Gig Jobs : फेस्टिव्ह सीझनमध्ये गिग जॉब्सचा झगमगाट; सात लाख नोकऱ्या होणार तयार

यामध्ये ई-कॉमर्स साईट्सचा मोठा वाटा आहे.
Gig Jobs India
Gig Jobs IndiaeSakal
Updated on

भारतात सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. नवरात्री, दसरा, दिवाळी, नाताळ असे अनेक सण आता डिसेंबरपर्यंत असणार आहेत. या काळात देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे ई-कॉमर्स आणि कित्येक दुकानांमध्ये सेल सुरू झाले आहेत. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कित्येक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची भरती देखील होत आहे.

आतापर्यंत अशा प्रकारचे तब्बल 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले असल्याची माहिती बिझनेस स्टँडर्डने दिली आहे. तसंच या सीझनमध्ये असे आणखी तीन लाख जॉब्स तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वर्षाअखेरीपर्यंत अशा सात लाख नोकऱ्या तयार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Gig Jobs India
Job Tips : फ्रेशर आहात अन् मुलाखतीला जाताय? मग या अतिशय उपयुक्त टिप्स नक्की वाचा

गेल्या वर्षीच्या तुलनेत भरमसाठ वाढ

2022 सालच्या फेस्टिव्ह सीझनमध्ये डिसेंबरपर्यंत असे 4,00,000 गिग जॉब्स तयार झाले होते. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच हा आकडा गाठला गेला आहे. डिसेंबरपर्यंतचे एकूण अंदाजित आकडे पाहता, यावर्षी गिग जॉब्समध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ होणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

ई-कॉमर्स साईट्सचा मोठा वाटा

या वाढीमध्ये ई-कॉमर्स साईट्सचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास एकट्या अमेझॉनने आतापर्यंत भारतात एक लाखांहून अधिक सीझनल नोकऱ्या तयार केल्याचं म्हटलं होतं. यासोबतच फ्लिपकार्टनेही एक लाख नवीन नोकऱ्या तयार केल्याचं स्पष्ट केलं आहे. या दोन्ही कंपन्यांचे मोठे सेल सध्या सुरू आहेत. तसंच दिवाळी अन् नाताळच्या आसपास देखील पुन्हा मोठ्या सेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Gig Jobs India
Meesho Jobs : सणासुदीच्या काळात 'मीशो'कडून नोकरीची मोठी संधी! येत्या काळात देणार पाच लाख नोकऱ्या

क्रिकेट वर्ल्ड-कपचा वाटा

यंदा आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप देखील भारतात होत आहे. या माध्यमातून देखील सुमारे एक लाखांहून अधिक गिग जॉब्स तयार झाले आहेत. डिलिव्हरी, ट्रान्सपोर्टेशन, हॉस्पिटॅलिटी आणि इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये नोकऱ्या तयार झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.