Dhule News: धुळ्यात गोदरेज अँड बॉयसने 25 मेगावॅट सौर प्रकल्पाचे काम केले पूर्ण; 45 लाख युनिट वीज निर्माण होणार

Godrej & Boyce’s 25MW Solar Project Dhule: गोदरेज अँड बॉयसला पुढील तीन वर्षांत सुमारे 40 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. याद्वारे टियर-II आणिटियर-III शहरांमध्ये आपला ब्रँड वाढवण्याची कंपनीची योजना आहे.
Godrej & Boyce’s 25MW Solar Project Dhule
Godrej & Boyce’s 25MW Solar Project DhuleSakal
Updated on

Godrej & Boyce’s 25MW Solar Project Dhule: गोदरेज अँड बॉयसला पुढील तीन वर्षांत सुमारे 40 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. याद्वारे टियर-II आणिटियर-III शहरांमध्ये आपला ब्रँड वाढवण्याची कंपनीची योजना आहे. ही नवीन गुंतवणूक आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत 400 शहरांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

याच योजनेअंतर्गत गोदरेज एंटरप्रायझेस समूहाचा एक भाग असलेल्या गोदरेज आणि बॉयसने नुकताच धुळ्यामध्ये राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि. साठी 25MW चा AC ग्राउंड-माउंट सौर प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

52 हेक्टरमध्ये पसरलेल्या या सौरऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी 45 लाख युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. कंपनी खुल्या बाजारात वीज विकेल आणि हरित ऊर्जेच्या महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे कंपनीने सांगितले आहे.

Godrej & Boyce’s 25MW Solar Project Dhule
IPO Alert: हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठा IPO येणार; टाटांना देणार टक्कर, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

राघवेंद्र मिर्जी, कार्यकारी उपाध्यक्ष आणि गोदरेज आणि बॉयसचे इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवसाय प्रमुख, यांनी सांगितले की, 2030 पर्यंत 500 GW गैर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा साध्य करण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावर आधारित आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, FY23 मध्ये महसूल 14796 कोटी रुपये होता. कंपनी सध्या दहापेक्षा जास्त उद्योगांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये अभियांत्रिकी समाधाने, ग्राहक उपकरणे, फर्निचर, लॉक आणि सुरक्षा उपायांचा समावेश आहे.

Godrej & Boyce’s 25MW Solar Project Dhule
EY Pune: 'इतके मेलेले लोक, फक्त अंतिम संस्कार...', CAच्या मृत्यूनंतर अश्नीर ग्रोव्हरचा व्हिडिओ व्हायरल

गोदरेज ग्रुपची सुरुवात 1897 मध्ये झाली होती. आज गोदरेज समूह अनेक क्षेत्रात व्यवसाय करत आहे. यामध्ये अभियांत्रिकी, सुरक्षा, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादने यांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये पसरलेला व्यवसाय गोदरेज कुटुंबात विभागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.