Godrej Family Split: गोदरेजमध्ये फूट! 127 वर्षे जुन्या ग्रुपमध्ये झाल्या वाटण्या; कोणाला काय मिळाले?

Godrej Family Split: 127 वर्षे जुने गोदरेज कुटुंब आता दोन भागात विभागले गेले आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचे हक्क मिळाले आहेत.
Godrej family seals deal to split 127-year-old conglomerate
Godrej family seals deal to split 127-year-old conglomerate Sakal
Updated on

Godrej Family Split: 127 वर्षे जुने गोदरेज कुटुंब आता दोन भागात विभागले गेले आहे. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचे हक्क मिळाले आहेत. त्यात पाच लिस्ट कंपन्या आहेत. आदि गोदरेजचे चुलत भाऊ जमशेद आणि स्मिता यांना लिस्ट नसलेल्या कंपनी गोदरेज अँड बॉयसची मालकी मिळणार आहे. या दोघांना गोदरेज अँड बॉयसशी संबंधित कंपन्यांसह मुंबईत मोठा भूखंड आणि महत्त्वाची मालमत्ता मिळणार आहे.

गोदरेज एंटरप्रायझेस समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार, समूह संस्थापक कुटुंबाच्या दोन शाखांमध्ये विभागला गेला आहे. एका बाजूला आदि गोदरेज (82) आणि त्याचा भाऊ नादिर (73) आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे चुलत भाऊ जमशेद गोदरेज (75) आणि स्मिता गोदरेज कृष्णा (74) आहेत.

Godrej family seals deal to split 127-year-old conglomerate
Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

गोदरेज कुटुंबाने विभाजन प्रक्रियेचे वर्णन गोदरेज कंपन्यांमधील भागधारकांच्या मालकी हक्कांची पुनर्रचना म्हणून केले आहे. दोन्ही गट गोदरेज ब्रँड वापरणे सुरू ठेवतील, असे निवेदनात म्हटले आहे.

गोदरेज ग्रुपची स्थापना अर्देशीर गोदरेज यांनी 1897 मध्ये केली होती. त्यांचा कुलूप बनवण्याचा व्यवसाय होता, त्यापूर्वी हाताने वैद्यकीय उपकरणे बनवण्याच्या व्यवसायात ते अपयशी ठरले होते. अर्देशीरला मुलगा नव्हता. त्यामुळे त्यांचा व्यवसाय त्यांचा भाऊ पिरोजशा गोदरेज यांच्या हाती आला.

Godrej family seals deal to split 127-year-old conglomerate
Paytm Payments Bank: पेटीएम वॉलेटला मोठा झटका! ग्राहकांची संख्या झाली कमी; कोणाला झाला फायदा?

पिरोजशा गोदरेज यांना सोहराब, डोसा, बुर्जोर आणि नवल असे चार मुलं होते. अनेक वर्षांनंतर, समूहाचा व्यवसाय बुर्जोर यांचा मुलगा आदि आणि नादिर तसेच नवलचा मुलगा आणि मुलगी जमशेद आणि स्मिता यांच्या हातात आला. सोहराबला मुलगा नव्हता, तर डोसाला एक मुलगा होता, रिशाद, ज्याला मूलबाळ नव्हते. आता 127 वर्षांनंतर समूहाच्या व्यवसायाची विभागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.