Godrej Group: 126 वर्ष जुन्या गोदरेज ग्रुपचे होणार तुकडे! कोट्यवधी रुपयांचे होणार दोन भाग, काय आहे कारण?

Godrej Group: नवीन पिढीबाबत कुटुंबात मतभेद आहेत.
Godrej Group
Godrej GroupSakal
Updated on

Godrej Group: गोदरेज कुटुंब हे एक गुजराती पारशी कुटुंब आहे, हे कुटुंब गोदरेज ग्रुपचे मालक आहेत. गोदरेज ग्रुपची सुरुवात 1897 मध्ये अर्देशीर गोदरेज आणि त्यांचे भाऊ पिरोजशा बुर्जोरजी गोदरेज यांनी केली होती. हा व्यवसाय ग्रुप रिअल इस्टेट, ग्राहक उत्पादने, औद्योगिक अभियांत्रिकी, उपकरणे, फर्निचर, संरक्षण आणि कृषी उत्पादने अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.

आदि गोदरेज, त्यांचा भाऊ नादिर गोदरेज आणि चुलत भाऊ जमशीद गोदरेज यांच्या नेतृत्वाखाली हे कुटुंब भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. फोर्ब्सनुसार गोदरेज समूहाची किंमत 1.76 लाख कोटी रुपये आहे.

कंपनीने मुंबईत कुलूप विकून आपला प्रवास सुरू केला. सध्या गोदरेज ग्रुपमध्ये वाटाघाटी होण्याची चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी Economic Times ला ही माहिती दिली आहे.

गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत

गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्सचे नेतृत्व आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर करतात. दरम्यान, गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (G&B) हे चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि स्मिता कृष्णा पाहत आहेत.

दोन्ही गट लवकरच अभियांत्रिकी, उपकरणे, सुरक्षा, कृषी उत्पादने, रिअल इस्टेट आणि ग्राहक उत्पादने यांसारख्या व्यावसायिक कंपन्यांचे विभाजन करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Godrej Group
Vehicle Selling : सणासुदीमुळे चालना वाहनविक्री सप्टेंबरमध्ये विक्रमी

3,400 एकर जमिनीचे विभाजन

माहिती असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले की यामध्ये G&B अंतर्गत असलेल्या सुमारे 3,400 एकर जमिनीचे विभाजन आणि इक्विटी क्रॉस होल्डिंगचे विभाजन करणार आहे. अहवालात एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, जमिनीच्या वितरणाबाबत काही समस्या आहेत.

ते म्हणाले, 'ही विभागणी हे आव्हानात्मक काम आहे. मूल्यांकन कसे केले जाईल आणि त्या बदल्यात दोन्ही पक्षांसाठी एक समान ऑफर तयार केली जाईल. हा संघर्षाचा मुख्य मुद्दा आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्रातील दिग्गज गोदरेज समूहाचे विभाजन आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना करत आहे.

Godrej Group
Pension Scheme: मोदी सरकारचा नवा प्लॅन, निवडणुकीपूर्वी पेन्शन हमी योजना जाहीर करणार?

2019 मध्ये गोदरेज कुटुंबात विक्रोळी येथे 1,000 एकर जमिनीवरून वाद सुरू झाल्याची बातमी आली होती. यानंतर कुटुंबात कलह वाढला. नवीन पिढीच्या भूमिकेबाबतही कुटुंबात मतभेद आहेत. त्यामुळे हे विभाजन होत असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.