नवी दिल्ली : या वर्षी दिवाळीत देशांतर्गत बाजारात सोने, रत्ने आणि दागिन्यांची ३० हजार कोटी रुपयांची विक्री होण्याची शक्यता आहे, असे उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर केवळ सोन्याची विक्री २० हजार कोटी रुपयांपर्यंत, तर चांदीची विक्री सुमारे २५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, देशभरात २५ टन सोने आणि २५० टन चांदीची विक्री होण्याची अपेक्षा आहे, असे ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी म्हटले आहे.