Budget 2024: लगीन घाई असणाऱ्यांना आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी फिरवली जादूची छडी आणि सोन्या-चांदीचे दागिने होणार स्वस्त

FM Nirmala Sitharaman: मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या संदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, मी सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 6% आणि प्लॅटिनमवरील 6.5% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.
gold and silver reduced Budget 2024
gold and silver reduced Budget 2024 Sakal
Updated on

Union Budget 2024-25: मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या संदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले की, सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क 6% आणि प्लॅटिनमवरील 6.5% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

स्टील आणि तांब्यावरील उत्पादन खर्च कमी होईल

सीतारामन यांनी स्टील आणि तांब्यावरील उत्पादन खर्च कमी करण्याची घोषणाही केली. त्या म्हणाल्या की फेरो निकेल आणि ब्लिस्टर कॉपरवरील बीसीडी काढून टाकण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

gold and silver reduced Budget 2024
Budget 2024: एक कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! मोदी सरकार आणणार महत्वाकांक्षी योजना

अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतर या गोष्टी स्वस्त होतील

  • कर्करोगाशी संबंधित तीन औषधांवर कस्टम ड्युटी हटवली. एक्स-रे ट्यूब आणि फ्लॅट पॅनल डिटेक्टरवरील आयात शुल्कही हटवण्यात आले.

  • मोबाईल फोन आणि पार्ट्स- पीसीबी आणि मोबाईल फोन चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.

  • 25 अत्यावश्यक खनिजांवर सीमाशुल्क नाही.

  • सोलर सेल आणि सोलर पॅनेलच्या निर्मितीवर कर सवलत.

  • सोने आणि चांदीवरील सीमाशुल्क सहा टक्के करण्यात आले.

  • प्लॅटिनमवरील सीमाशुल्क आता 6.4 टक्के करण्यात आले आहे.

gold and silver reduced Budget 2024
Budget 2024: रोजगार वाढण्यासाठी मोदी सरकार देणार 2 लाख कोटी...? अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला प्लॅन

या गोष्टींसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील

  • पीव्हीसी फ्लेक्स बॅनर आयात करणे महाग होईल.

  • काही दूरसंचार उपकरणांची आयात महाग होईल. मेक इन इंडिया अंतर्गत देशात तयार होणाऱ्या स्वस्त घरगुती उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची सरकारची घोषणा.

  • एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या इक्विटी गुंतवणूक महाग होतील. कर 15% वरून 20% करण्यात आला.

  • एक वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलेले शेअर्स महाग होतील. कर 10 टक्क्यांवरून 12.5 टक्के करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com