Gold Buying Tips : सोनं खरेदी करताना या ५ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर भोगावं लागेल मोठ नुकसान...

फार पुर्वीपासूनच सोन्यात गुंतवणुक करणं फायद्याचं समजलं जातं.
 gold buying
gold buyingesakal
Updated on

Gold Buying Tips : सोन्याला भारतीय संस्कृतीत आणि व्यापारी दृष्टीकोनातून पहिल्यापासूनच महत्वाचे स्थान आहे. गुंतवणूकीच्या सर्वात जुन्या पर्यायापैकी एक सोनं आहे. पण सोनं खरेदी करताना फार सावधान असणं आवश्यक आहे. काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं. त्यामुळेच आज आम्ही सोनं खरेदी करताना कोणत्या महत्वाच्या ५ गोष्टींकडे लक्ष द्यावं हे सांगणार आहोत.

हॉलमार्क

  • भारतीय मानक ब्यूरो म्हणजेच बीआयएस चे हॉलमार्क सोन्याची शुद्धता निश्चित करतो.

  • म्हणूनच हॉलमार्क दागिने खरेदीच्या दृष्टीकोनातून सर्वात शुद्ध मानले जातात.

  • सोनं २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि त्यापेक्षा कमी अशा शुद्धतेच्या वेगवेगळ्या व्हेरीयंटमध्ये मिळतं.

  • त्यामुळे हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करणे सुरक्षित असते.

 gold buying
Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; चांदीची चकाकीही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

मेकिंग चार्जेसवर बार्गेन करा

  • सोन्याचे दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जेस जाणणे फार आवश्यक असते.

  • विक्रेत्याशी यावर मोलभाव करून ते कमी करून घेणे फार गरजेचे असते.

  • मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या किंमतीच्या ३० टक्के पर्यंत असू शकते. ते कमी करण्यासाठी तुम्ही बार्गेन करू शकतात.

सोन्याच्या दराकडे लक्ष ठेवा

  • सोन्याच्या किंमतींवर लक्ष ठेवणे फार गरजेचे असते.

  • भविष्यात सोन्याचे दर घटतील की, नाही याचा अंदाज बांधणे कठीण असतं. यासाठी काही सराफांशी विचारणा करत रहायला हवे.

  • यासंदर्भात अपडेट राहण्यासाठी सोन्याच्या भावाच्या बातम्या वाचणे आवश्यक आहे.

 gold buying
SBI Sovereign Gold Bond : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये स्वस्तात खरेदी करू शकता सोने; काय आहे योजना

बिल

  • सोन्याची काहीही खरेदी केली की, त्याचं बिल न विसरता घेणं आवश्यक आहे.

  • काही वर्षांनी जेव्हा सोनं विकतात तेव्हा कॅपिटल गेन टॅक्सची गणनेसाठी खरेदीचे मूल्य माहिती असायला हवे. यासाठी बिल प्रुफ म्हणून कामात येतं.

  • दागिन्यांच्या बिलावर तुम्ही खरेदी केलेल्या दागिन्याची शुद्धतेबरोबरच त्याचा दर आणि वजनाविषयी पण माहिती दिलेली असते.

  • जर तुमच्याकडे दागिन्यांचं बिल नसेल तर सोनार त्याच्या मनाला येईल त्या भावाने दागिने खरेदी करण्याचा प्रयत्न करेल. यात तुमचंच नुकसान आहे.

वजन तपासून घेणे

जेव्हाही सोनं खरेदी करतात तेव्हा त्याचे वजन चेक करून घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.