Gold Rate: मोदी सरकारच्या निर्णयामुळे सोन्याची मागणी वाढणार; 750 टन सोन्याची विक्री होण्याची शक्यता

Gold Demand: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर भावात मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या बारवरील आयात शुल्क 15% वरून 6%, आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% वरून 6% पर्यंत कमी झाले आहे.
Gold Demand
Gold DemandSakal
Updated on

Gold Demand: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सोने, चांदी आणि प्लॅटिनमवरील सीमा शुल्कात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर भावात मोठी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या बारवरील आयात शुल्क 15% वरून 6%, आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% वरून 6% पर्यंत कमी झाले आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पात घोषित केलेल्या शुल्क कपातीमुळे वर्ष 2024 मध्ये सोन्याची मागणी 750 टन होण्याची शक्यता आहे.

Gold Demand
Tata Motors: टाटा मोटर्सने रचला इतिहास; आता टेस्लाला देणार टक्कर? कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

तसेच आगामी सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीची मागणी वाढणे अपेक्षित आहे. नुकत्याच संपलेल्या वर्ष 24 च्या एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 5 टक्क्यांनी घसरून 149.7 टन झाली आहे.

Gold Demand
Infosys: इन्फोसिसच्या अडचणीत मोठी वाढ; जीएसटीने पाठवली 32,000 कोटी रुपयांची नोटीस, काय आहे प्रकरण?

एप्रिल-जून तिमाहीत भारतातील दागिन्यांची मागणी वार्षिक तुलनेत 17 टक्क्यांनी घसरून 106.5 टन झाली. जैन म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येतील. यामुळे तिसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) आणि चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या वर्षी मागणीत घट झाली होती

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, 2023 मध्ये, भारतातील सोन्याची मागणी घसरून 745.7 टन होती. मागणीतील ही घसरण, चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. यामागचे कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती.

Gold Demand
best stocks to buy : कोणते शेअर ठरतील फायदेशीर?

रोजगार निर्मितीसोबतच निर्यातीतही या क्षेत्राचा मोठा वाटा

देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. रोजगार निर्मितीसोबतच निर्यातीतही या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सोने 2022 मध्ये 52,000-53,000 रुपयांवरून 2023 मध्ये 65,000 रुपयांवर पोहचले (10 ग्रॅम). यंदा भाव आणखी वाढले आहेत. मात्र, अलिकडच्या आठवड्यात सोन्याचे भाव वर्षाच्या सुरुवातीच्या उच्चांकावरून घसरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.