Gold Import: भारतीयांमध्ये सोन्याची क्रेझ वाढली! सोन्याच्या खरेदीने केला नवीन रेकॉर्ड

Gold Import: सीमाशुल्कात मोठी कपात आणि सणांमुळे वाढलेली मागणी यामुळे ऑगस्टमध्ये सोन्याची आयात दुपटीने वाढून 10.06 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत सोन्याची आयात 4.93 अब्ज डॉलर होती.
Gold Import record high
Gold Import record high Sakal
Updated on

Gold Import: सीमाशुल्कात मोठी कपात आणि सणांमुळे वाढलेली मागणी यामुळे ऑगस्टमध्ये सोन्याची आयात दुपटीने वाढून 10.06 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत सोन्याची आयात 4.93 अब्ज डॉलर होती.

सोन्याच्या आयातीच्या या विक्रमी पातळीबद्दल वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, सोन्याची तस्करी आणि इतर कारवाया कमी करता याव्यात यासाठी सोन्यावरील सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत.

बर्थवाल यांनी सांगितले की, सणाच्या काळात ज्वेलर्स विक्रीसाठी त्यांच्या वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात करतात. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने शुल्क 15 टक्क्यांवरून सहा टक्के करण्याची घोषणा केली होती.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल-जुलै) भारताची सोन्याची आयात 4.23 टक्क्यांनी घसरून 12.64 अब्ज डॉलर झाली होती. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाची सोन्याची आयात 30 टक्क्यांनी वाढून 45.54 अब्ज डॉलर झाली आहे.

Gold Import record high
Taj Hotel: टाटांच्या ताज हॉटेलने रचला इतिहास; भारतातील बनली नंबर वन कंपनी, किती आहे मार्केट कॅप?

सोन्याची सर्वाधिक आयात कुठून होते?

भारत स्वित्झर्लंडमधून सर्वाधिक सोने आयात करतो, ज्याचा वाटा सुमारे 40 टक्के आहे. यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) 16 टक्के आयात होते आणि हा देश भारताला सोने आयात करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका सुमारे 10 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. देशाच्या एकूण आयातीत या मौल्यवान धातूचा वाटा पाच टक्क्यांहून अधिक आहे.

Gold Import record high
Rich Indians: भारतात करोडपतींच्या संख्येत मोठी वाढ; 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या 31,800वर, एवढा पैसा येतो कुठून?

व्यापार तूट वाढली

सोन्याच्या आयातीतील वाढीमुळे ऑगस्टमध्ये देशाची व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील फरक) 29.65 अब्ज डॉलर झाली. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ही आयात प्रामुख्याने ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.