Gold Loan: भारतीय बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. शेअर बाजारापासून ते रिटेलपर्यंत सर्वच क्षेत्रात तेजी दिसत आहे. या सोबतच कर्ज बाजाराचा आलेखही झपाट्याने वर गेला आहे. त्यातही विशेषत: सोन्यावर कर्ज घेण्याचा कल वाढला आहे. घरात ठेवलेल्या सोन्याच्या बदल्यात लोक बँकांमधून पैसे घेत आहेत. येत्या पाच वर्षांत त्याचा आकार दुप्पट होईल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.