Gold Rate Today: सोन्याने पार केला 65,000 रुपयांचा टप्पा; या किंमतीवर सोने खरेदी करावे का?

Gold Rate 5th March 2024: आज मंगळवारी ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव मागील बंद किंमतीपेक्षा 1,000 रुपयांनी वाढला आहे.
gold price above rupees 65000 is this right time to buy gold jewelry
gold price above rupees 65000 is this right time to buy gold jewelry Sakal
Updated on

Gold Rate 5th March 2024 (Marathi News): आज मंगळवारी ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65000 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव मागील बंद किंमतीपेक्षा 1,000 रुपयांनी वाढला आहे. चांदीचा भाव 74,400 रुपये आहे.

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,600 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेटसाठी ग्राहकांना 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागतील.

मुंबईत आजचा सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 58,740 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा दर

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 59,450 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 64,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

gold price above rupees 65000 is this right time to buy gold jewelry
Richest Person: ॲमेझॉनचे जेफ बेझोस बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्कची दुसऱ्या स्थानावर घसरण, काय आहे कारण?

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

LKP सिक्युरिटीज तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, गेल्या महिन्याच्या तुलनेत औद्योगिक आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्यांच्या खराब आकडेवारीमुळे बाजारात अस्थिरता आहे. तसेच फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या 6-7 मार्च 2024 रोजी येणाऱ्या निकालामुळे बाजारात अस्थिरता वाढू शकते. त्यामुळे सोन्याचे भाव वाढलेले दिसत आहेत.

सोन्याच्या भाव 'या' कारणांवर अवलंबून असतात

सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असतात. सोन्याची मागणी वाढल्यास भावही वाढतात. सोन्याचा पुरवठा वाढला तर भाव कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या भावावर परिणाम होतो.

gold price above rupees 65000 is this right time to buy gold jewelry
RBI Action: पेटीएम सारखी RBIची आणखी एक कारवाई; 'या' कंपनीवर गोल्ड लोन देण्यास घातली बंदी, शेअर्स 20 टक्के घसरले

उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()