Gold Silver Price Today In India 8 November 2024: सोन्याच्या भावात आज 8 नोव्हेंबर रोजी मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज शुक्रवारी सोन्याच्या भावात दोन हजार रुपयांनी घट झाली आहे. देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,500 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,000 रुपये आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि स्थानिक मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. तर चांदी 92,900 रुपये आहे. कालच्या तुलनेत चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी घसरला.