Gold Rate Today: वर्षभरात सोने २० टक्क्यांनी वधारले! वर्षअखेर भाव ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता

Gold and Silver Latest Price Update: गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि दागिन्यांना मिळणारी पसंती, अशा विविध कारणांमुळे सोन्याचा भाव गेल्या वर्षभरात १० ग्रॅममागे १२ हजार रुपयांनी वाढला. आता तो १० ग्रॅमला ७२,५०० रुपयांवर पोचला आहे.
Gold price increased by 20 percent in a year end of the year price will go beyond 80 thousand rupees
Gold and Silver Latest Price UpdateSakal
Updated on

Gold-Silver Rate Today 18 April 2024: गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित, पारंपरिकदृष्ट्या असलेले महत्त्व आणि दागिन्यांना मिळणारी पसंती, अशा विविध कारणांमुळे सोन्याचा भाव गेल्या वर्षभरात १० ग्रॅममागे १२ हजार रुपयांनी वाढला. आता तो १० ग्रॅमला ७२,५०० रुपयांवर पोचला आहे. टक्केवारीचा विचार करता गेल्या मार्चपासून वर्षभरात सोने २० टक्क्यांनी वधारले. वर्षअखेर हा भाव ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

तेजी कायम राहणार

सर्व परिस्थिती सुरळीत झाली तरी सोन्याचा भाव लगेच कमी होण्याची शक्यता नाही. गेल्या वर्षभरातील भाववाढ पाहता यापुढेही तेजी कायम राहू शकते. सोन्याचा भाव अपेक्षेच्या तुलनेत लवकर ७० हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. यापुढे अशीच वाढ होण्याची शक्यता आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

Gold price increased by 20 percent in a year end of the year price will go beyond 80 thousand rupees
Payment Aggregator : पेमेंट अॅग्रिगेटरसाठी नव्या सूचना; कठोर नियमांच्या दिशेने रिझर्व्ह बँकेचे पाऊल

भाव वाढण्याची प्रमुख कारणे

  • अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली खरेदी

  • इराण आणि इस्राईलमधील युद्धजन्य परिस्थिती

  • रशिया-युक्रेन युद्धाचे संकट कायम

  • जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी

  • अमेरिका व युरोपातील बाजारपेठांतील मंदीचे वातावरण

  • वाढत्या व्याजदरातील अस्थिरता

  • अपरिहार्य कारणांमुळे वाढलेली खरेदी

Gold-Silver Rate
Gold-Silver RateSakal

''आंतरराष्ट्रीय घटना, भू-राजकीय तणाव आणि मागणीत अचानक झालेली वाढ, यामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. सोन्यातील गुंतवणुकीत चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे त्यात गुंतवणूक करणे सुरक्षित ठरले आहे. जेवढी अनिश्चितता असेल तेवढे सोने वाढणार आहे. अनिश्चितता कायम राहील, असे वाटते. पुढील सहा ते आठ महिने अशीच स्थिती राहू शकते. काही दिवसांनी एक ते दोन हजार रुपयांनी कमी-जास्त होऊन भाव स्थिरावतील.''

- अमित मोडक, कमोडिटीतज्ज्ञ

Gold price increased by 20 percent in a year end of the year price will go beyond 80 thousand rupees
Success Story : महिला उद्योजिकेची यशोगाथा : नव्या व्यवसायाला ‘जेनेरिक’ची मात्रा; औषधविक्रीतून देशात सर्वाधिक उलाढाल

''अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. त्याशिवाय इतर काही कारणांमुळे सोन्याचा भाव वाढत आहे. उत्पादनाच्या तुलनेत मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. येत्या वर्षअखेरीस सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या तेजी असल्याने सावधपणे गुंतवणूक करावी.''

- डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.