Silver And Gold Price Today: आज 30 ऑक्टोबरला सोन्याने इतिहास रचला आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. त्याचे कारण म्हणजे अमेरिकेत पुढील महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुका.
निवडणूक निकालापूर्वी गुंतवणूकदार सोन्यात अधिक गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढली असून त्याचा परिणाम भावावर होत आहे. स्पॉट गोल्ड 0.1 टक्क्यांनी वाढून 2,778.27 डॉलर प्रति औंस झाला आहे.