Gold Outlook: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ; जाणून घ्या काय आहे कारण?

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
Gold Silver Rate
Gold Silver Rate Sakal
Updated on

Gold Outlook: गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांच्या तेजीसह 60,511 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान MCX वर सोन्याने 61,181 रुपये प्रति दहा ग्रॅमचा उच्चांक गाठला.

चांदीमध्येही 2,352 रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली. चांदी प्रति किलो 74,570 रुपयांच्या पातळीवर बंद झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत विशेषतः विकसित देशांमध्ये मंदीचा धोका वाढत आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले असून त्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे.

या कारणांमुळे सोन्या-चांदीत वाढ झाली आहे:

सोन्या-चांदीच्या किंमती वाढण्यामागे पाच प्रमुख कारणे आहेत. भारतात लग्नाचा हंगाम मार्च-एप्रिलपासून सुरू होतो जो दिवाळीपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालतो. किंमत निश्चितच जास्त आहे, परंतु मागणीतही तेजी दिसून येत आहे.

सणासुदीच्या मागणीमुळे किंमतीत वाढ होत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे. तेथेही सोन्याची मागणी वाढताना दिसत आहे. बँकिंग संकटामुळे फेडरल रिझर्व्हची भूमिका मवाळ होत आहे.

त्यामुळे डॉलर कमजोर होत असून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकाही मोठ्या प्रमाणावर भौतिक सोन्याची खरेदी करत आहेत. बँकिंग संकटामुळे मंदीचे संकट अधिक गडद होत आहे. या सर्व बाबींमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.

Gold Silver Rate
Dividend stocks: गुंतवणूकदारांची होणार चांदी; 'या' आठवड्यात 6 कंपन्याची एक्स-डिव्हिडंड डेट, जाणून घ्या

डॉलरमध्ये घसरण होत आहे आणि सोन्याची किंमत वाढत आहे:

सोन्याच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अक्षय्य तृतीयेला सोन्याला मोठी मागणी असते. यावेळी अक्षय तृतीय 22 एप्रिलला आहे. रमजान आणि ईदच्या निमित्तानेही सोन्याला चांगली मागणी असते.

मंदीच्या काळात मध्यवर्ती बँकाही प्रत्यक्ष सोने खरेदी करत आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित कमकुवत आकडेवारी जाहीर होत आहे. फेडरल रिझर्व्हची भूमिका मवाळ होत आहे, त्यामुळे डॉलरमध्ये घसरण होत आहे आणि सोन्याची किंमत वाढत आहे.

Gold Silver Rate
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.