Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Gold Prices: भारतीयांचे सोन्या-चांदीवर विशेष प्रेम आहे. सध्या नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी हे सण येणार आहेत. यानंतर भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. त्यात लाखो लग्नांसाठी करोडो रुपयांची सोने खरेदी होणार आहे.
Gold Prices
Gold PricesSakal
Updated on

Gold Prices: भारतीयांचे सोन्या-चांदीवर विशेष प्रेम आहे. सध्या नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी हे सण येणार आहेत. यानंतर भारतात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. त्यात लाखो लग्नांसाठी करोडो रुपयांची सोने खरेदी होणार आहे.

इराण-इस्रायल युद्धामुळे सोने विक्रमी उच्चांक गाठत आहे. या सोबतच सोन्याची मागणीही वाढत आहे. लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. गेल्या 10 महिन्यात सोन्याने 19.80 टक्के रिटर्न दिला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव 3000 डॉलरपर्यंत पोहोचेल

सोन्याच्या किमतीबाबत सिटीग्रुप, गोल्डमन सॅक्स आणि बीएमआयने अहवाल सादर केला आहे. यामध्ये तिन्ही अहवालात एकमत आहे की सोन्याची किंमत प्रति औंस 3000 डॉलर पर्यंत पोहोचेल. सध्या सोन्याच्या आंतरराष्ट्रीय भावावर नजर टाकली तर ते 2678.70 प्रति औंस डॉलरवर आहे.

सोने ही नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानली जाते आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची मागणी वाढते. फक्त गोल्डमन सॅक्सने सोन्याची किंमत 2,900 डॉलरपेक्षा जास्त वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Gold Prices
Stock Market Crash: सेन्सेक्स-निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद; गुंतवणूकदारांचे 3.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे बाजारात गोंधळाचे वातावरण आहे, मात्र या परिस्थितीचे सोने व्यापाऱ्यांसाठी संधीत रूपांतर होत आहे. सोने वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्हाला 12 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकते.

तीन महिन्यांत 12 टक्के वाढीचा अर्थ असा आहे की इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा कमोडिटी मार्केटवर परिणाम होत राहील आणि मौल्यवान धातूंच्या किमती वाढतच राहतील.

सोन्याच्या वाढीमागे काय कारण आहेत?

सोन्याच्या वाढीमागे काही विशेष कारणे आहेत, जसे की जागतिक अशांततेच्या काळात सोन्याचा वापर सुरक्षित गुंतवणूक म्हणून केला जातो आणि देशांच्या मध्यवर्ती बँकांपासून ते मोठ्या संस्था सोने खरेदी करतात. युद्धादरम्यान, भारतात सोन्याची किंमत झपाट्याने वाढते आणि त्याचे उदाहरण म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध.

Gold Prices
Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंतांचा द्वेष का करतात? नितीन कामथ यांनी सांगितलं कारण; म्हणाले, आपला समाज...

रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती 4.55 टक्क्यांनी वाढल्या होत्या. देशात सध्या सोन्याचा भाव 76,315 रुपये प्रति 10 ग्रॅम (MCX किंमत) आहे आणि त्यानंतर डिसेंबरपर्यंत 85 हजार रुपयांचा टप्पा पार केल्यास त्यात थेट 12 टक्क्यांनी वाढ होईल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.