Nepal Gold Price : भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये सोन्याचा भाव 15,900 रुपयांनी कमी झाला आहे. नेपाळ सरकारने भारताची भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात भारत सरकारनेही सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत कमी केले होते.
त्यामुळे सोने सुमारे 6 हजार रुपयांनी स्वस्त झाले होते. नेपाळ सरकारनेही असेच पाऊल उचलले आहे, त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा सुमारे 16 हजार रुपयांनी कमी झाला आहे.