Gold Price: सोने खरेदी करू नका, थांबा! सोने 5,000 रुपयांपर्यंत घसरणार; ब्रोकरेजने केला दावा

Gold Price: अलीकडेच, सोन्याचा भाव 78,450 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. नवरात्री आणि दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात. अशा स्थितीत सोन्याचे खरेदीदार, लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणारे किंवा सोन्यात गुंतवणूक करणारे सगळेच सोन्याचे भाव पडण्याची वाट पाहत आहेत.
gold price motilal oswal
gold price motilal oswalSakal
Updated on

Gold Price: अलीकडेच सोन्याचा भाव 78,450 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. नवरात्री आणि दिवाळीच्या काळात सोन्याचे भाव वाढतात. अशा स्थितीत सोन्याचे खरेदीदार, लग्नसोहळ्यासाठी दागिने खरेदी करणारे किंवा सोन्यात गुंतवणूक करणारे सगळेच सोन्याचे भाव पडण्याची वाट पाहत आहेत.

जेणेकरून, त्यांना कमी किमतीत सोने खरेदी करता येईल. जर तुम्हाला सध्या सोने खरेदी करायचे नसेल तर तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. सोन्यामध्ये लवकरच 5,000 रुपयांपर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सोने 70,000 रुपयांच्या पातळीवर येऊ शकते.

सोन्यात 5,000 रुपयांची घसरण होईल

मोतीलाल ओसवाल यांच्या अहवालानुसार, सोन्याच्या किमतीत काही काळ स्थिरता दिसून येईल. सोन्यामध्ये लवकरच 5-7% घसरण अपेक्षित आहे. म्हणजेच हिशोब केला तर सध्याच्या दरानुसार सोन्याचा भाव 5000 रुपयांपेक्षा जास्त कमी होऊ शकतो. अहवालात म्हटले आहे की, 2000 पासून सोन्यामध्ये 32% वार्षिक नफा दिसला नाही. त्यामुळे सोन्यामध्ये घसरण अपेक्षित आहे.

gold price motilal oswal
Viral Video: मुंबईच्या वडापाव विक्रेत्याचे उत्पन्न ऐकून कॉर्पोरेट लोकांना बसेल धक्का; सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस
सोन्याचे भाव आता का वाढत आहेत?

अहवालात आगामी यूएस अध्यक्षपदाची निवडणूक, देशांतर्गत ETF आयात, SPDR होल्डिंग्स आणि CFTC पोझिशन्स यासारखी अनेक कारणे नमूद केली आहेत, ज्यामुळे सोन्याचे भाव सतत वाढत आहेत. 2024 च्या पहिल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या किमती वाढण्याची मुख्य कारणे यूएस फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि भू-राजकीय परिस्थिती आहे. मध्यवर्ती बँकांकडून अपेक्षित मागणी आणि देशांतर्गत सण आणि लग्नाचा हंगाम यामुळे बाजारातील भाव वाढत होते.

दोन वर्षांत सोने 86,000 रुपयांवर पोहोचेल

मोतीलाल ओसवाल यांनी येत्या दोन वर्षांत सोन्याचा भाव 86,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्याच्या सणासुदीच्या काळात जोरदार मागणी या तेजीला अधिक चालना देत आहे. ग्रामीण भागातही सोन्याच्या मागणीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.

gold price motilal oswal
Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा

अनुकूल मान्सून आणि पिकांची चांगली पेरणी यामुळे ग्रामीण आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. भारतीय गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्पात नुकत्याच झालेल्या आयात शुल्कात कपात आणि ईटीएफवर कर सूट दिल्यानंतर ईटीएफची मागणी वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.