Gold Rate: सोन्याच्या भावात मोठी वाढ; दिवाळीपर्यंत सोने किती महागणार?

Gold Rate: दिवाळीच्या हंगामात सोन्याच्या भावात मोठी वाढ होत आहे.
Gold prices to reach Rs 63,000 during Diwali report by Motilal Oswal Financial Services
Gold prices to reach Rs 63,000 during Diwali report by Motilal Oswal Financial Services Sakal
Updated on

Gold Rate: दिवाळीच्या हंगामात सोन्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही तर जागतिक बाजारपेठेतही सोन्याचे भाव वाढत आहेत. गेल्या एका वर्षात सोन्याची किंमती 20 टक्क्यांनी वाढली आहे.

म्हणजेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात 20 टक्के परतावा मिळाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही दिवसांत भारतीय बाजारात सोन्याचा भाव 57 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 60 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, दिवाळीच्या हंगामात सोन्याचा भाव 63,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. या अहवालात असे म्हणले आहे की केंद्रीय बँकेची बदलती धोरणे, भू-राजकीय अनिश्चितता यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये या वर्षी लक्षणीय चढउतार झाले आहेत.

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढत असताना, अलीकडील ट्रेंड नुसार गुंतवणूकदार विशिष्ट प्रसंगाची वाट पाहण्याऐवजी संधीचा फायदा घेत आहेत. 5 डिसेंबर 2023 रोजी सोन्याचा भाव 60,448 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

सोन्याच्या बाजारातील तेजीला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक घटकांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत.

Gold prices to reach Rs 63,000 during Diwali report by Motilal Oswal Financial Services
Dividend Stock: 100 टक्के डिव्हिडेंड देतेय 'ही' कंपनी; खात्यात पैसे कधी येणार?

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

चीन, पोलंड, तुर्कस्तान, कझाकस्तान सारख्या देशांकडून जोरदार खरेदी होत आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या भावात या वर्षी लक्षणीय वाढ झाली आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय बँकांनी चलनविषयक धोरणात आक्रमक पावले उचलली आहेत, यूएस फेडरल रिझर्व्हने महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.

Gold prices to reach Rs 63,000 during Diwali report by Motilal Oswal Financial Services
नोटबंदीचा गाजावाजा करणाऱ्या मोदी सरकारला खरंच यश मिळाले का? काळा पैसा आणि कॅशलेस व्यवहाराचा लेखाजोखा

सोन्याच्या किंमती वाढवण्यात भू-राजकीय घडामोडींचाही मोठा वाटा आहे. संकटकाळात सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे, इस्रायल-हमास युद्धासारख्या अलीकडील घटनांमुळे भू-राजकीय तणाव वाढला आहे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे.

भू-राजकीय तणाव कमी करणे किंवा यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्या सतत बदलत्या भूमिकेचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. तसेच हे घटक अपेक्षेपेक्षा जास्त काळ परिणाम करु शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.