Gold All Time High: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर; रिटर्नच्या बाबातीत सर्व मालमत्ता वर्गांना टाकले मागे

Gold Prices All Time High: जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. बुधवारी 25 सप्टेंबरला सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढला आणि 77,850 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचला. सणासुदीच्या काळात खरेदीचा विचार करणाऱ्या लोकांना सोन्याच्या भावातील सातत्याने होणारी वाढ धक्का देणारी आहे.
Gold Prices All Time High
Gold Prices All Time HighSakal
Updated on

Gold Prices All Time High: जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. बुधवारी 25 सप्टेंबरला सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढला आणि 77,850 रुपये प्रति 10 ग्रॅमचा नवीन विक्रमी उच्चांकावर पोहचला. सणासुदीच्या काळात खरेदीचा विचार करणाऱ्या लोकांना सोन्याच्या भावातील सातत्याने होणारी वाढ धक्का देणारी आहे.

सोन्यातच नाही तर चांदीच्या भावातही वाढ होत आहे. औद्योगिक मागणीत वाढ झाल्यामुळे चांदीचा भाव 3,000 रुपयांनी वाढून 93,000 रुपये प्रति किलो झाला आहे, जो गेल्या सत्रात 90,000 रुपये प्रति किलो होता.

Gold Prices All Time High
Zerodha Scam: झिरोधामध्ये सर्वात मोठा स्टॉक ब्रोकिंग घोटाळा; 15 लोकांनी केली करोडोंची लूट, 432 बनावट खाती

आयबीजेएचे सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,200 डॉलर प्रति औंस पार करू शकतो. मिलवूड कानाचे संस्थापक आणि सीईओ निश भट्ट यांनी सोन्याच्या किमतींबाबत सांगितले की, सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे किमतींनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे.

ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 28 टक्के आणि देशांतर्गत बाजारात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर एनएसईच्या निफ्टीत केवळ 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच 2024 मध्ये सोन्याने परतावा देण्यात सर्व मालमत्ता वर्गांना मागे टाकले आहेत.

Gold Prices All Time High
Hinduja Group: 9 महिने तपास, 2,500 कोटींची करचोरी! हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय ठरतोय

निश भट्ट म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव सुमारे 2,700 डॉलर प्रति औंस आहे. देशांतर्गत बाजारात तो 76,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. ते म्हणाले, फेडकडून व्याजदरात आणखी कपात होण्याची शक्यता असल्याने किंमती वाढल्या आहेत.

व्याजदर कपातीमुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाला असून, तो परवडणारा आहे. तर लेबनॉन-इस्रायल तणावासह जगातील इतर क्षेत्रातील तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.