Gold Silver Rate Today (Marathi News): आज बुधवारी ज्वेलरी मार्केटमध्ये सोन्याचा भाव 65,630 रुपये आहे. सोन्याचा भावाने नवा उच्चांक गाठला आहे. दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65,010 रुपये आहे. सोन्याच्या भावात वाढ सुरूच आहे. चांदीचा भाव 74,800 रुपये आहे. (Gold Rate on new record high check latest gold rate on 10 grams)
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,6100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेटसाठी ग्राहकांना 65,010 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागतील.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 58,750 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 59,4600 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव 64,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
LKP सिक्युरिटीज तज्ज्ञ जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, गेल्या महिन्याच्या तुलनेत औद्योगिक आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्यांच्या आकडेवारीमुळे किंमती वाढल्या आहेत. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या 6-7 मार्च 2024 रोजी नियोजित निकालानंतर बाजारातील अस्थिरता वाढू शकते, ज्यामुळे सोन्याच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.
सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.