Gold Rate Today: लग्नसराईत सोन्याने गाठला 70 हजारांचा टप्पा; भावात आणखी वाढ होण्याची शक्यता

Gold-Silver Rate Today 30 March 2024: सोने बाजारात शुक्रवारी विक्रमी नोंद झाली. सोन्याच्या दराने प्रतितोळा (‘जीएसटी’सह) 70 हजार रुपयांचा टप्पा पार केला. एकीकडे लग्नसराई व दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
Gold Rate Rises In India Check 24 Carat Price On 30 March 2024
Gold Rate Rises In India Check 24 Carat Price On 30 March 2024Sakal
Updated on

Gold-Silver Rate Today 30 March 2024: सोने बाजारात शुक्रवारी विक्रमी नोंद झाली. सोन्याच्या दराने प्रतितोळा (‘जीएसटी’सह) 70 हजार रुपयांचा टप्पा पार केला. एकीकडे लग्नसराई व दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

पाच ते 29 मार्च या कालावधीतील सोन्याच्या बाजारातील चित्र पाहता पंचवीस दिवसांत सोन्याच्या दरात सहा हजारांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली आहे. एका महिन्यात एवढा मोठा परतावा सोन्या-चांदीने दिल्याने गुंतवणूकदार सोने, चांदी खरेदीकडे वळाले आहेत.

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात चांदीचा दर 72,500 रुपये प्रति किलो इतका होता. 26 फेब्रुवारीस सोने 62,400 होते, तर चांदी 71 हजारांवर होती. पाच मार्चला सोन्याचे दर 64,300 तर चांदीचे दर 73 हजारांवर (विना जीएसटी) होते. गुरुवारपर्यंत (ता. 28) सोने 66,300 तर सोने 75 हजार (विना जीएसटी) होते. ‘जीएसटी’सह सोने प्रतितोळा 70,040 तर चांदी प्रतिकिलो 78,280 वर पोचली आहे.

Gold Rate Rises In India Check 24 Carat Price On 30 March 2024
China: चीनमधील रिअल इस्टेट संकट अधिक गडद; 2 मोठ्या कंपन्या कर्जाच्या विळख्यात, नेमकं काय घडतय?

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Rate Rises In India Check 24 Carat Price On 30 March 2024
HDFC Bank Home Loan: एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका; गृहकर्जावरील व्याजदरात केली वाढ

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.