Gold Rate Today: खुशखबर! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Gold Rate Today Marginally Falls In India Check 24 Carat Price In Your City On 9 November 2023
Gold Rate Today Marginally Falls In India Check 24 Carat Price In Your City On 9 November 2023 Sakal
Updated on

Gold Silver Price Today Latest Update 9 November 2023:

तुम्ही धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशी-दिवाळीच्या आठवड्यात सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव कमी झाला आहे.

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आसपास अनेकदा सोन्याच्या भावात वाढ दिसून येते, परंतु यावेळी हा कल कमी दिसतो. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 61,190 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,090 रुपये आहे. याव्यतिरिक्त, चांदीचा सध्याचा भाव 73,500 रुपये प्रति किलोग्राम आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 61,7400 रुपये

  • कोलकत्ता - 61,190 रुपये

  • दिल्ली - 61,340 रुपये

  • मुंबई - 61,190 रुपये

  • पुणे - 61,190 रुपये

  • पटना - 61,240 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Rate Today Marginally Falls In India Check 24 Carat Price In Your City On 9 November 2023
Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये पुन्हा कर्मचारी कपात; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना दिला नारळ

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Rate Today Marginally Falls In India Check 24 Carat Price In Your City On 9 November 2023
IPO News: फिश प्रोटीन प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीचा लवकरच येणार आयपीओ, सेबीकडून ग्रीन सिग्नल

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.