Gold Silver Price: चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण; सोनेही 600 रुपयांनी झाले स्वस्त, घसरणीमागचे कारण काय?

Gold Silver Price: तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुरुवारी, 13 जून 2024 रोजी चांदीच्या भावात 2,000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.
Gold Silver Price
Gold Silver PriceSakal
Updated on

Silver Record Dip at MCX: तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुरुवारी, 13 जून 2024 रोजी चांदीच्या भावात 2,000 रुपयांपर्यंत मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर कालच्या तुलनेत सोने 600 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. चांदीच्या भावात 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, सध्या चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.

चांदी दोन हजार रुपयांनी स्वस्त

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली असून कालच्या तुलनेत चांदी 1921 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 88,524 रुपये प्रति किलोवर आली आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव 90,554 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

सोने 600 रुपयांनी स्वस्त

चांदीसोबतच वायदा बाजारात सोन्याच्या भावातही घसरण होत आहे. गुरुवारी एमसीएक्सवर सोने कालच्या तुलनेत 582 रुपयांनी स्वस्त होऊन 71,388 रुपयांवर आले. बुधवारी सोन्याचा भाव 71,970 रुपयांवर बंद झाला होता.

Gold Silver Price
Apple Company: ॲपलने मायक्रोसॉफ्टला टाकले मागे; पुन्हा बनली जगातील सर्वात मौल्यवान कंपनी

परदेशी बाजारातही सोने-चांदी स्वस्त

देशांतर्गत बाजाराबरोबरच परदेशी बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हचा अहवाल सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल म्हणाले की, महागाई वाढीच्या दरात नरमाई आली आहे परंतु ती अजूनही खूप जास्त आहे. आम्ही महागाई दर 2 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी काम करत आहोत. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल आणि सर्वांना फायदा होईल.

प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव काय आहेत?

  • दिल्लीत 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

  • चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने 72,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 95,200 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

  • मुंबईत 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

  • पुण्यात 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 90,700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.

Gold Silver Price
ATM Charges: ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग; शुल्क वाढवण्याची ऑपरेटर्सची मागणी

सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहिल्यानंतरच दागिने खरेदी करा, ही सोन्याची सरकारी हमी आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क ठरवते. सर्व कॅरेटचे हॉल मार्क नंबर वेगवेगळे असतात, ते पाहिल्यानंतरच सोने खरेदी करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com