Gold Rate Today: लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात घसरण, सोन्याचा भाव 56 हजारांवर

Gold Rate Today: देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.
Gold Silver Price fall Today check Latest Update 12 December 2023
Gold Silver Price fall Today check Latest Update 12 December 2023 eSakal
Updated on

Gold Silver Price Today Latest Update 12 December 2023:

आज 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भावात अनुक्रमे 500 रुपयांची आणि 600 रुपयांची घसरण झाली आहे. जर तुमच्या घरात लग्न आहे आणि तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,000 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,000 रुपये आहे. चांदीचा भाव 75,500 रुपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • कोलकत्ता - 61,910 रुपये

  • हैदराबाद - 61,910 रुपये

  • मुंबई - 61,910 रुपये

  • पुणे - 61,910 रुपये

  • पटना - 61,960 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

Gold Silver Price fall Today check Latest Update 12 December 2023
Sebi: शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवलेत? 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा 'हे' काम, अन्यथा...

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Silver Price fall Today check Latest Update 12 December 2023
Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत RBIचा मोठा इशारा; राज्यांनी आश्वासने...

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.