Gold Rate Today: रेकॉर्डब्रेक तेजीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण; काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today: सोन्याचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले आहेत.
Gold Silver Price Today after all time high gold rate falls continuously on 2nd day Latest Update 6 December 2023
Gold Silver Price Today after all time high gold rate falls continuously on 2nd day Latest Update 6 December 2023 Sakal
Updated on

Gold Silver Price Today Latest Update 6 December 2023: सोमवारी रेकॉर्डब्रेक तेजी गाठल्यानंतर सोन्याचे भाव सलग दुसऱ्या दिवशी घसरले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 400 रुपयांवर आला आहे. आज सोन्याचा भाव 63,000 रुपयांच्या खाली आहे. चांदीच्या भावातही आज घसरण झाली.

80,000 चा भाव ओलांडल्यानंतर आज चांदीचा भाव 78,200 रुपये आहे. जर तुम्हीही तुमच्या लग्नासाठी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आधी भाव जाणून घ्या.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • कोलकत्ता - 62,670 रुपये

  • दिल्ली - 62,820 रुपये

  • मुंबई - 62,670 रुपये

  • पुणे - 62,670 रुपये

  • पटना - 62,720 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Silver Price Today after all time high gold rate falls continuously on 2nd day Latest Update 6 December 2023
Adani Group: शेअर बाजाराच्या तेजीत अदानी समूहाचा मोठा वाटा, गुंतवणूकदारांनी कमावले 1.9 लाख कोटी

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Silver Price Today after all time high gold rate falls continuously on 2nd day Latest Update 6 December 2023
LIC: एलआयसी जगातील चौथी सर्वात मोठी विमा कंपनी, पहिल्या क्रमांकावर कोण?

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()