Gold Rate Today
Gold Rate TodayEsakal

Gold Rate Today: खरेदीदारांना झटका! लग्नसराईत सोन्याच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढू लागले आहेत.
Published on

Gold Silver Price Today Latest Update 4 December 2023: देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. आज सोन्याच्या भावात बदल झाला आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,760 रुपये आहे. तुम्हीही तुमच्या लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भाव जाणून घ्या.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 64,350 रुपये

  • कोलकत्ता - 63,760 रुपये

  • दिल्ली - 63,910 रुपये

  • मुंबई - 63,760 रुपये

  • पुणे - 63,760 रुपये

  • पटना - 63,810 रुपये

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Rate Today
गुंतवणूक विश्वातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व चार्ली मंगर

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Rate Today
Share Market Today: भाजपच्या विजयाचा परिणाम शेअर बाजारावर दिसणार, ट्रेडिंग लिस्टमध्ये ठेवा हे 10 शेअर्स

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.