Gold Rates: धनत्रयोदशीपूर्वी सोने झाले स्वस्त ; चांदीचे भावही घसरले, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

Gold Silver Price Today: दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून 1,450 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
Gold Silver Price Today:
Gold Silver Price Today:Sakal
Updated on

Gold Silver Price on 26 October 2024: दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून 1,450 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावातही घसरण दिसून आली आहे.

3000 रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्लीत चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या खाली आला आहे. प्रॉफिट बुकींग आणि परदेशातील कमकुवत मागणीमुळे सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.