Gold Silver Price Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण, 'इतक्या' रुपयांनी सोने-चांदी झाले स्वस्त

Gold Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत आहे.
Gold Silver Rate
Gold Silver RateSakal
Updated on

Gold Silver Price Today Latest Update On 26 September 2023: गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 59,000 रुपये आणि 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर होता आणि आज सोन्याचा भाव 58,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. सोने आणि चांदी या दोन्हींच्या भावात आज घसरण झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याचे भाव अजूनही घसरत आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी घसरून 58,675 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. याशिवाय चांदीचा भाव 0.51 टक्क्यांनी घसरून 71,780 रुपये प्रति किलोवर आहे.

22 कॅरेट सोन्याचा भाव

आज देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. याशिवाय, मुंबईत 54,750 रुपये, गुरुग्राममध्ये 54,900 रुपये, कोलकात्यात 54,750 रुपये, लखनऊमध्ये 54,900 रुपये आणि जयपूरमध्ये 54,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. सोमवारीही सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Rate
Manmohan Singh Birthday: एक निर्णय अन् 30 वर्षात कोट्यवधी लोक आले गरिबीतून बाहेर, असं होतं मनमोहन सिंग यांचं अर्थकारण

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold Silver Rate
Jobs in India: कामगारांच्या पगारात घट तर बेरोजगारांच्या संख्येत वाढ, धक्कादायक आकडेवारी आली समोर

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.