Gold Silver Rate: ग्राहकांना मोठा धक्का! सोन्याच्या भावात 430 रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचा भाव

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.
Gold Silver Rate
Gold Silver RateSakal
Updated on

Gold Silver Rate: तुम्हालाही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे.

त्यामुळे आज स्थानिक बाजारात सोन्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे. प्रसिद्ध सराफ व्यापारी अनिल गुप्ता यांनी सांगितले की, सोन्या-चांदीच्या भावात आणखी चढ-उतार पाहायला मिळतील.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • दिल्ली - 60,830 रुपये

  • हैदराबाद - 60,680 रुपये

  • कोलकत्ता - 60,680 रुपये

  • लखनऊ - 60,830 रुपये

  • मुंबई - 60,650 रुपये

  • पुणे - 60,650 रुपये

  • नागपूर - 60,650 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी :

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Gold Silver Rate
Who is Pratik Doshi: देशाच्या अर्थमंत्र्यांच्या जावयाचे आहे गुजरात कनेक्शन; PM मोदींसोबत आहे...

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

नवा नियम:

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.

मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.

Gold Silver Rate
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.