Gold Silver Rate: सोने-चांदीच्या भावामध्ये चढ-उतार सुरूच; ‘चांदी’त दिवसभरात प्रतिकिलो चौदाशे रुपयांनी ‘उसळी’

Gold Silver Rate Today: सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. सोन्याचे भाव गेले दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज प्रती दहा ग्रॅमला चारशे रुपयांची वाढ झाली.
Gold Silver Rate
Gold Silver RateSakal
Updated on

Gold Silver Rate: सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतही दिसून येत आहे. सोन्याचे भाव गेले दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज प्रती दहा ग्रॅमला चारशे रुपयांची वाढ झाली. सोन्याचे आजचे प्रतितोळा भाव ७२ हजार ६०० रुपये होते.

दुसरीकडे चांदीने किलोमागे दिवसभरात तब्बल १,४०० रुपयांची ‘उसळी’ घेतली. त्यामुळे चांदीत झालेली वाढ सर्वांसाठी चक्रावून टाकणारी आहे. आगामी काळात सोने आणि चांदीतील ही भाववाढ अशीच सुरू राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेला सुवर्णबाजार पुन्हा वधारत असल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याला सोन्याचा प्रतितोळा भाव जीएसटीसह ७४ हजार ३६६ रुपयांवर होता. चांदीच्या भावातही किलोमागे तीन हजारांची वाढ होऊन चांदी ८५ हजार ३८७ रुपयांवर गेला होता. आगामी दोन महिने लग्नसराई नाही.

यामुळे सोन्याची मागणी घटली आहे. आता गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव गेल्या आठवड्याच्या सुरवातीला २० मेस प्रति दहा ग्रॅमला (विना जीएसटी) ७४,९०० रुपये होता. त्यानंतर मंगळवारी (ता. २१) ७४,५०० रुपये होता.

त्यानंतर बुधवारी (ता. २३) सोन्यात तब्बल हजारांची घसरण होऊन भाव ७४ हजार ५०० वरून ७३ हजार ३०० वर आले. तर गेल्या दोन, तीन दिवस सोन्याचे भाव स्थिर राहून आज पुन्हा चारशे रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Gold Silver Rate
MEIL Business: निवडणूक रोख्यांमधून भाजपाला हजारो कोटींचे दान; आता पैशांअभावी कंपनीला विकावा लागणार व्यवसाय

सोन्याचा भाव सोमवारी (ता. २७) प्रति दहा ग्रॅमला ७२ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचला. सोन्याच्या भावात दिवसागणिक होणारे बदल हे गुंतवणूकदारांसह जाणकारांनाही चक्रावून टाकणारे आहेत.

''आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर सोने व चांदीचे भाव अवलंबून असतात. गेल्या पंधरवड्यात भावात सातत्याने कमी- जास्त बदल झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारही याकडे आकर्षित झाले असून, पुढील काही दिवस भाव स्थिर राहण्याची चिन्हे कमीच आहेत.''

- मिलिंद विसपुते, सराफ व्यावसायिक, जळगाव

चांदीकडे गुंतवणूकदारांनी वेधले लक्ष

आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेले चढ-उतार, महागाईचा वाढता दबाव, औद्योगिक क्षेत्रात वाढलेली मागणी, अशा सर्वच कारणांमुळे चांदीच्या भावात वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. ११ ते १४ मेदरम्यान चांदीचा भाव ८५ हजारांखाली अर्थात ८४ हजार ९०० पर्यंत खाली आला.

Gold Silver Rate
Adani Port: भारतात पोहोचले सर्वात मोठे कंटेनर जहाज; 4 फुटबॉल मैदाना इतकी लांबी, अदानी समूहाने केला विक्रम

परंतु १६ मेस चांदीत तब्बल दीड हजाराची किलोमागे वाढ झाली होती. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ९० हजारांवर स्थिर असलेली चांदी सोमवारी मात्र किलोमागे चौदाशे रुपयांनी वधारली. त्यामुळे चांदीच्या भावातील या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनीही लक्ष वेधले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.