financial burden : सोने महागल्याने बजेट विस्कळित ; लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांवर संकट

एकीकडे लोकसभा निवडणुकीचा मोसम सुरू होऊन राजकीय वारे वाहू लागले आहेत.तर दुसरीकडे सोने, चांदीच्या दरातही वाढ होऊन सराफ बाजाराला झळाळी येत आहे. दुसरीकडे सोन्या- चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईवर दिसणार आहे.
financial burden
financial burdensakal
Updated on

जळगाव : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा मोसम सुरू होऊन राजकीय वारे वाहू लागले आहेत.तर दुसरीकडे सोने, चांदीच्या दरातही वाढ होऊन सराफ बाजाराला झळाळी येत आहे. दुसरीकडे सोन्या- चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईवर दिसणार आहे. लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

अनेक दिवसांपासून फारसा चढ-उतार नसलेल्या सोन्याच्या दरात मार्चच्या सुरवातीपासून वाढ सुरू झाली. १० फेब्रुवारीला ६२ हजार ९०० रुपये असलेले सोने महिनाभरात तीन हजार शंभर रुपयांनी वधारले. स्थानिक सराफा बाजारात सध्या सोने (२४ कॅरेट) प्रतिदहा ग्रॅम ६५ हजार ५०० (विना जीएसटी), तर चांदी प्रतिकिलो ७५ हजारांवर पोचली आहे. दर आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. लग्नसराई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता आलेली असल्याने सोन्या-चांदीची मागणी वाढली आहे.

financial burden
Adani Group News : १.२ लाख कोटींची गुंतवणूक ; अदानी समूहाकडून वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रावर भर

दरात सातत्याने वाढ

1 लग्नसराईच्या काळात दागिन्यांत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. स्थानिक बाजारात सोन्यातील दरवाढ कायम आहे. मागील सहा दिवसांत दोन हजार २५० रुपयांनी वाढ झाली. चांदी प्रतिकिलो ७५ हजारांपर्यंत पोचली आहे.

2बुधवारी (ता. १३) सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ६५ हजार ३०० रुपये (जीएसटी अत्तिरिक्त) होते. हा दर सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मे मध्ये सोने ६२ हजारांच्या पार गेले होते.

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर असे

तारीख सोने चांदी

  • १ मार्च ६२ हजार ५०० ७१ हजार

  • ५ मार्च ६४ हजार ३०० ७३ हजार

  • ८ मार्च ६४ हजार ८०० ७४ हजार

  • १६ मार्च ६५ हजार ५०० ७५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.