Gold Rate Today: विवाहाचे बजेट बिघडले; सोन्या-चांदीच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today in India: सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे.
Gold Silver rate today gold price slight increase Latest Update 27 November 2023
Gold Silver rate today gold price slight increase Latest Update 27 November 2023 Sakal
Updated on

नागपूर, ता. २६ ः सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाल्याने महागाईची झळ आता लग्नसराईला बसू लागली आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लग्न समारंभ असलेल्या कुटुंबांवर आर्थिक बोजा वाढला आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नासाठी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. दर वाढल्याने ग्राहकांचे बजेट विस्कळित झाले आहे. त्यामुळे ग्राहकांचे पुन्हा टेन्शन वाढले आहे.

सोने प्रति दहा ग्रॅम ६२ हजारावर तर चांदी प्रति किलो ७५ हजार १०० रुपयांवर पोहचली आहे. सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. आठवड्यात सोन्यात ७०० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीतही १२०० रुपयांनी दर वाढला. शुक्रवारी सोन्याचे दर ६१ हजार ९०० रुपयांवर होते तर चांदी प्रति किलो ७४ हजार ८०० रुपये होती.

अशातच सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने प्रति दहा ग्रॅम १०० रुपयांनी तर चांदी ४०० रुपयांनी महागली आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा पेट्रोल -डिझेलसह धातूंवर देखील झालेला पाहायला मिळाला आहे. सोने ६२ हजारावर गेले असून जीएसटीसह ६४ हजाराच्या जवळ पोहचले आहे.

Gold Silver rate today gold price slight increase Latest Update 27 November 2023
निष्क्रिय पॅन कार्डचे वास्तव

विशेष म्हणजे सोने यंदा मे महिन्यात ६२ हजाराच्या पार गेले होते. पुन्हा एकदा लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. चांदीने प्रथमच प्रति किलो ७५ हजाराचा आकडा पार केला आहे. याचा परिणाम लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या कुटुंबांवर दिसून येत आहे. तुळशी विवाह संपताच लग्नसोहळे सुरू झाले आहेत.

अशा स्थितीत लोकांना महागड्या किमतीत दागिने खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे. महागाईची छाया लग्नसराईवर दिसत आहे. लग्नसराईचा हंगाम पाहता येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Gold Silver rate today gold price slight increase Latest Update 27 November 2023
विजबिलाच्या नावाखाली ९८ हजार रुपयांचा झटका

लग्नसराई आणि जागतिक स्तरावर अस्थिरता आलेली असल्याने सोन्या-चांदीची मागणी वाढलेली आहे. तसेच लग्नसराईत सर्वाधिक सोन्याची खरेदी होत असतानाच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. पुढील काही दिवसात सोन्या - चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. लवकरच सोने ६५ हजाराच्या जवळपास जाईल.

-राजेश रोकडे,

उपाध्यक्ष, ऑल इंडिया जेम्स ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.