Gold Rate Today: लग्न सराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या भावात वाढ; काय आहे आजचा भाव?

Gold Rate Today in India: There has been a slight increase in gold and silver prices.
Gold Rate Today
Gold Rate TodayEsakal
Updated on

Gold Silver Price Today Latest Update 24 November 2023:

लग्न सराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीची मागणी अचानक वाढते. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोन्या आणि चांदीच्या भावात थोडी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 61,000 रुपयांवर आहे. चांदीचा भाव 73,000 रुपयांवर पोहोचला आहे.

देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 1,993.80 प्रति औंस डॉलरवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी चांदी 0.01 टक्क्यांनी वाढून 23.765 प्रति औंस डॉलरवर आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई- 62,500 रुपये

  • कोलकत्ता - 61,970 रुपये

  • दिल्ली - 62,120 रुपये

  • मुंबई - 61,970 रुपये

  • पुणे - 61,970 रुपये

  • पटना - 62,020 रुपये

Gold Rate Today
Barclays Layoffs: जगातली सर्वात मोठी बँक करणार कर्मचारी कपात; 2,000 कर्मचाऱ्यांची होणार हकालपट्टी

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

Gold Rate Today
Medical Inflation: सर्वसामान्यांना मोठा धक्का! भारतात वैद्यकीय महागाईचा दर 14 टक्क्यांवर

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.