Gold Rate Today: सलग दहाव्या दिवशी सोने झाले महाग; भाव वाढीमागे आहे चीन कनेक्शन

Gold-Silver Rate Today 11th March 2024: सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. सोने रोज नवीन उच्चांक गाठत आहे. तीन दिवस बाजार बंद राहिल्यानंतर आज बाजार सुरू झाला आहे. सलग दहाव्या दिवशीही सोन्याच्या भावाच वाढ होत आहे.
Gold-Silver Rate Today 11th March 2024
Gold-Silver Rate Today 11th March 2024Sakal
Updated on

Gold-Silver Rate Today 11th March 2024: सोन्या-चांदीच्या भावात वाढ सुरूच आहे. सोने रोज नवीन उच्चांक गाठत आहे. तीन दिवस बाजार बंद राहिल्यानंतर आज बाजार सुरू झाला आहे. सलग दहाव्या दिवशीही सोन्याच्या भावाच वाढ होत आहे. एका आठवड्यात सोने 4 टक्क्यांनी महाग झाले आहे. (Chinese Central Bank buying set the stage for gold’s latest record run)

दिल्लीत आज सोन्याचा भाव

11 मार्च 2024 पर्यंत दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 60,890 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 66,410 रुपये आहे.

मुंबईत आज सोन्याचा भाव

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 60,740 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,260 रुपये आहे.

अहमदाबादमध्ये आजचा सोन्याचा भाव

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम 60,790 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,310 रुपये आहे.

सोन्याच्या भावात वाढ का होत आहे?

जर आपण सोन्याच्या वाढीमागील कारणाबद्दल बोललो तर डॉलर निर्देशांक 7 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनची सेंट्रल बँक आपल्या सोन्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ करत आहे. चीनच्या सोन्याच्या साठ्यात जानेवारीत सलग 15 व्या महिन्यात वाढ झाली आहे.

Gold-Silver Rate Today 11th March 2024
EFTA Deal: 15 वर्षांत भारतात होणार 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; 10 लाख तरूणांना मिळणार रोजगार

आता चीनचा सोन्याचा साठा 2,245 टनांवर पोहोचला आहे, जो ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत सुमारे 300 टन अधिक आहे. सेंट्रल बँक ऑफ चायनासोबतच चीनमधील लोकही मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार आहे.

सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी तेथील लोक नाणी, बार आणि दागिने खरेदी करत आहेत. चीनमधील शेअर बाजार आणि बांधकाम क्षेत्राची अवस्था वाईट आहे. यामुळेच चीनी लोक सोन्यात मोठी गुंतवणूक करत आहेत.

Gold-Silver Rate Today 11th March 2024
Adani Group: पुढील 10 वर्षांत अदानी समूह 'या' व्यवसायात करणार 60 हजार कोटींची गुंतवणूक; काय आहे प्लॅन?

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold)

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()