Goldman Sachs Gold Price: भारतात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात खळबळ उडाली आहे. याशिवाय 18 आणि 19 नोव्हेंबर या तारखा बाजूला ठेवल्या तर त्यापूर्वीचे अनेक दिवस सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळेही लोकांनी सोने खरेदीत रस दाखवला आहे. पण, आता दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. Goldman Sachsच्या अहवालानुसार सोन्याच्या भावात मोठी वाढ होऊ शकते.