Goldman Sachs Layoff: जगातील सर्वात मोठी आर्थिक सल्ला देणारी कंपनी करणार नोकर कपात; 1,800 कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

Goldman Sachs Layoff: आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था गोल्डमन सॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार आहे. बँकेने 3-4 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे सुमारे 1300-1800 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागेल.
Goldman Sachs Layoff
Goldman Sachs LayoffSakal
Updated on

Goldman Sachs Layoff: आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था गोल्डमन सॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होणार आहे. बँकेने 3-4 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे सुमारे 1300-1800 कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलने (WSJ) अहवाल दिला आहे की कर्मचारी कपात अलीकडेच सुरू झाली आहे आणि ती पुढेही चालू राहील. त्याचा फटका बँकेच्या अनेक विभागांना बसणार आहे.

गोल्डमन सॅक्सचे प्रवक्ते टोनी फ्रॅटो म्हणतात की ही वार्षिक पुनरावलोकन प्रक्रिया आहे. त्यांनी असेही सांगितले की ही कर्मचारी कपात असूनही, डिसेंबर 2024 च्या शेवटी कर्मचाऱ्यांची संख्या 2023 पेक्षा जास्त असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.