Digital Gold Investment: भारतीयांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याची क्रेझ कायम आहे. देशात दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होते. पण, बदलत्या तंत्रज्ञानामुळे सोने खरेदीच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. भारतीयांमध्ये डिजिटल सोन्याचे आकर्षण झपाट्याने वाढत आहे.
अलीकडेच, NAVI ने डिजिटल सोन्याचे गुंतवणूकदार आणि गैर-गुंतवणूकदार यांच्यात केलेल्या सर्वेक्षणात 4 प्रमुख कारणे समोर आली आहेत. ज्यामुळे डिजिटल सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. यासोबतच डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीबाबतची आव्हानेही सर्वेक्षण अहवालातून समोर आली आहेत.
सर्वेक्षणानुसार, 50% गुंतवणूकदारांनी गुंतवणूक अशासाठी केली की अलीकडच्या काळात सोन्याने चांगला परतावा दिला आहे.
सर्वेक्षण केलेल्यांपैकी 39% लोकांचा असा विश्वास आहे की डिजिटल सोने हे घरात भौतिक सोने ठेवण्यापेक्षा कमी धोकादायक आहे. त्यामुळे चोरीची चिंता राहत नाही.
सर्वेक्षण केलेल्यांपैकी 36% लोकांनी 'डिजिटल सोन्या'मध्ये गुंतवणूक केली आहे. कारण त्याच्यामध्ये असलेली 24 कॅरेटची शुद्धता.
सर्वेक्षणात 25% लोकांना असे वाटते की डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ॲप्सद्वारे कधीही सोन्याची खरेदी, विक्री आणि त्यांच्या गुंतवणूकीचा ट्रॅक ठेवणे सोपे होते.
सर्वेक्षणात सहभागी नसलेल्या ग्राहकांपैकी 67% डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याच्या प्रक्रियेबद्दल किंवा त्यातून त्यांना मिळणारे फायदे याबद्दल अनभिज्ञ आहेत.
दागिन्यांमधून खरेदी केलेल्या सोन्याला स्पर्श आणि अनुभव करण्याच्या क्षमतेमुळे, सर्वेक्षण केलेल्यांपैकी 44% लोकांनी भौतिक सोन्याला प्राधान्य दिले.
सर्वेक्षणानुसार, डिजिटल सोन्यात गुंतवणूक न करण्यामागील इतर काही कारणे म्हणजे शेअर बाजाराच्या तुलनेत कमी परतावा, ऑनलाइन फसवणुकीची भीती यामुळे लोक डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.