Google Layoffs: गुगलचे कर्मचारी चिंतेत! पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं, नेमकं कारण काय?

Google Layoffs: या वर्षी अनेक टेक कंपन्यांनी नोकरी कपात पुन्हा सुरू केल्याचे दिसत आहे.
Google Layoffs Tech Giant Slashes 40 To 45 People In News Division Amid Slow Growth
Google Layoffs Tech Giant Slashes 40 To 45 People In News Division Amid Slow GrowthEsakal
Updated on

Google Layoffs: जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Googleने 40 ते 45 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या न्यूज डिव्हिजनमध्ये कर्मचारी कपात केली आहे. गुगलच्या अधिकृत प्रवक्त्याने या कर्मचारी कपातीची माहिती दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने असेही म्हटले आहे की 100 हून अधिक लोक अजूनही न्यूज विभागात काम करत आहेत.

गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “न्यूज डिव्हिजन ही आमची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आम्ही आमच्या संस्थेत काही बदल केले आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. या संक्रमण काळात कर्मचाऱ्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देत आहोत. त्यांना Google मध्ये किंवा त्यापलीकडे नवीन संधींसाठी पूर्ण सहकार्य केले जाईल.

Google Layoffs Tech Giant Slashes 40 To 45 People In News Division Amid Slow Growth
MSP Hike: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! सरकारने गहू आणि मसूरसह 6 रब्बी पिकांवर वाढवला MSP

या वर्षी अनेक टेक कंपन्यांनी नोकरी कपात पुन्हा सुरू केल्याचे दिसते. अलीकडील नोकऱ्या कपातीमध्ये LinkedIn, Qualcomm, Bandcamp आणि Stack Overflow यांचा समावेश आहे. LinkedIn ने सुमारे 668 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यामुळे 2023 मध्ये कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 1,400 वर आली आहे.

Google Layoffs Tech Giant Slashes 40 To 45 People In News Division Amid Slow Growth
Wipro Merger: विप्रो कंपनीचा मोठा निर्णय! 5 कंपन्यांचे होणार विलीनीकरण, काय आहे कारण?

बर्‍याच टेक कंपन्या आणि स्टार्टअप्स त्यांचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात करत आहेत आणि नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती कमी केली आहे. दरम्यान 21 जानेवारी रोजी Google ची मूळ कंपनी Alphabet ने देखील 12,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.