Google Layoffs: गुगलने पुन्हा केली कर्मचारी कपात; भारतातील कामावर होणार मोठा परिणाम

Layoffs 2024: गुगल कर्मचाऱ्यांची पुन्हा कपात करत आहे. गुगलने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. वृत्तानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.
Google lays off employees, shifts some roles abroad amid cost cuts
Google LayoffsSakal
Updated on

Google Layoffs 2024: गुगल कर्मचाऱ्यांची पुन्हा कपात करत आहे. गुगलने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. वृत्तानुसार, कंपनीच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, खर्चात कपात करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.

प्रवक्त्याने कर्मचारी कपातीमुळे प्रभावित होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत कोणतीही माहिती दिली नाही. कंपनी कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झालेल्या काही लोकांना भारत, शिकागो, अटलांटा आणि डब्लिनसह गुंतवणूक करत असलेल्या ठिकाणी हस्तांतरित करणार आहे.

या वर्षी, टेक आणि मीडिया कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होत आहे, त्यामुळे यापुढेही कर्मचारी कपात सुरू राहण्याची भीती वाढली आहे. कारण कंपन्या आर्थिक अनिश्चिततेशी झुंजत आहेत.

बिझनेस इनसाइडरचा अहवाल काय म्हणतो?

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, गुगलच्या रिअल इस्टेट आणि वित्त विभागातील अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. अहवालात म्हटले आहे की प्रभावित होणाऱ्या विभातील कर्मचारी गुगल ट्रेझरी, बिझनेस सर्व्हिसेस आणि रेव्हेन्यू कॅश ऑपरेशन्समधील आहेत.

Google lays off employees, shifts some roles abroad amid cost cuts
Paytm: पेटीएमला आणखी एक झटका! सरकारने पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करण्यास घातली बंदी, काय आहे कारण?

गुगलने जानेवारीतही कर्मचारी कपात केली होती

गुगलने जानेवारीमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले, ज्यात इंजिनीअरिंग, हार्डवेअर आणि सपोर्ट टीमचा समावेश आहे, कारण कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफर करण्यासाठी गुंतवणूक वाढवली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना कपातीबाबत चेतावणी दिली होती.

Google lays off employees, shifts some roles abroad amid cost cuts
Gold Rate Today: वर्षभरात सोने २० टक्क्यांनी वधारले! वर्षअखेर भाव ८० हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता

गेल्या वर्षी 12 हजार कर्मचारी कपात केली होती

गुगलने गेल्या वर्षी सुमारे 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. त्या कपातीमध्ये, हार्डवेअर, जाहिरात विक्री, खरेदी, धोरण, अभियांत्रिकी आणि YouTube यासह सर्व विभागातील कर्मचारी प्रभावित झाले होते. टेक कंपन्या 2022 पासून कर्मचारी कपात करत आहेत. गेल्या वर्षीही जगभरातील टेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.