Google AI genius Noam Shazeer
Google AI genius Noam ShazeerSakal

Google: नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यापुढे गुगल झुकलं; 22,000 कोटी रुपये देऊन परत बोलावलं, पण का?

Google AI genius Noam Shazeer: गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी AI तज्ञ नोम शाजिर यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यासाठी कंपनीला 2.7 अब्ज डॉलर (22,600 कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम मोजावी लागली.
Published on

Google AI genius Noam Shazeer: गुगलने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी AI तज्ञ नोम शाजिर यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यासाठी कंपनीला 2.7 अब्ज डॉलर (22,600 कोटी रुपये) इतकी मोठी रक्कम मोजावी लागली. यापूर्वी गुगलमध्ये काम करणाऱ्या शाजिरने 2021 मध्ये स्वतःचा AI स्टार्टअप Character.AI ची स्थापना केली होती.

नोम शाजिर, AI च्या क्षेत्रातील तज्ञ मानला जातो. नोमने 2000 मध्ये पहिल्यांदा Google मध्ये कामाला सुरुवात केली होती. गुगलमध्ये असताना, त्याने त्याचा सहकारी डॅनियल डी फ्रीटास यांच्यासोबत एक चॅटबॉट विकसित केला. मात्र, गुगलने हा चॅटबॉट सुरू करण्यास नकार दिल्याने शाजिरने कंपनी सोडली.

Google AI genius Noam Shazeer
Coldplay Concert: 'बुक माय शो'च्या सीईओला अटक होणार? कोल्डप्ले कॉन्सर्टचे प्रकरण पडणार महागात

यानंतर शाजिर आणि फ्रीटास यांनी मिळून Character.AI नावाचा स्टार्टअप सुरू केला, जो लवकरच सिलिकॉन व्हॅलीमधील सर्वात लोकप्रिय AI स्टार्टअप बनला. अल्पावधीतच त्याच्या स्टार्टअपचे मूल्य 1 बिलियन डॉलरवर पोहोचले. Google ने Character.AI च्या तंत्रज्ञानाचा परवाना देण्यासाठी आणि शाजिरला कंपनीत परत आणण्यासाठी 2.7 बिलियन डॉलरचा करार केला आहे.

गुगल कर्मचाऱ्यांच्या मते, शाजिरचे गुगलमध्ये परतणे हे या डीलमागील मुख्य कारण आहे. याव्यतिरिक्त, ओपनएआयच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी जेमिनी एआय मॉडेल विकसित करणार आहे. शाजिर गुगलच्या एआय युनिट, डीपमाइंडचे नेतृत्व करेल.

Google AI genius Noam Shazeer
Tata Group: भारतात पहिल्यांदाच घडणार! टाटा परदेशात उभारणार डिफेन्स फॅक्टरी; काय आहे कंपनीचा प्लॅन?

गुगलच्या माजी सीईओ यांनी कौतुक केले

गुगलचे माजी सीईओ एरिक श्मिट यांनी देखील शाजिरच्या प्रतिभेची प्रशंसा केली होती. 2015 मध्ये ते म्हणाले होते की, एआयमध्ये मानवी बुद्धिमत्ता विकसित करू शकणारा कोणी असेल तर तो शाजिर असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.