Alphabet Layoffs: गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. यावेळी कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी अल्फाबेट ही पहिली कंपनी आहे.
कंपनीने आधीच नोकरभरती कमी केली आहे. टेक कंपन्यांनी 2023 च्या सुरुवातीस कर्मचारी कपात सुरू केली होती. अल्फाबेटसह, मेटा आणि अॅमेझॉनसह अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी आधीच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, अल्फाबेटने शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अल्फाबेटने जानेवारीमध्ये सुमारे 12,000 नोकऱ्या कमी केल्या होत्या.
12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले
यापूर्वी जानेवारी महिन्यात अल्फाबेटने हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आकडेवारीनुसार, कंपनीने 12,000 लोकांना कामावरून काढले होते. त्यानंतर कंपनीचे एकूण कर्मचारी 6 टक्क्यांनी कमी झाले.
अमेरिकेसह जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मोठ्या कंपन्यांसोबतच स्टार्टअप्सनीही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. एम्प्लॉयमेंट फर्म चॅलेंजरच्या अहवालानुसार कर्मचारी कपातीमध्ये जुलै ते ऑगस्टमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.
मोठ्या टेक कंपन्यांपासून ते छोट्या स्टार्टअपपर्यंत, सर्वांनी कर्मचारी कपातीची समान कारणे दिली आहेत. यापैकी मुख्यतः कंपनीची ठासळलेली आर्थिक परिस्थिती आणि जागतिक मंदी ही कारणे सांगितली जात आहेत.
भारतीय टेक इकोसिस्टममध्येही कर्मचारी कपात केली जाऊ शकते. आतापर्यंत 11 हजाराहून अधिक भारतीय स्टार्टअपने कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 40 टक्क्यांनी अधिक आहे. भारतातील एकूण कर्मचारी कपात जागतिक स्तरावरील कर्मचारी कपातीच्या 5 टक्के आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.