Google Pay: यूजर्सना मोठा झटका! गुगल पे अमेरिकेत होणार बंद; काय आहे कारण?

Google Pay App: गुगल पे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण आता कंपनीने या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुने गुगल ॲप बंद करणार आहे. Android होमस्क्रीनवर दिसणारे 'GPay' ॲप ही जुनी आवृत्ती आहे.
Google Pay is shutting down in the US in june
Google Pay is shutting down in the US in juneSakal
Updated on

Google Pay App Shutting Down: गुगल पे ॲप भारत, सिंगापूर आणि अमेरिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण आता कंपनीने या ॲपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गुगल आता जुने गुगल ॲप बंद करणार आहे. (Google Pay is shutting down in the US in june)

Android होमस्क्रीनवर दिसणारे 'GPay' ॲप ही जुनी आवृत्ती आहे जी पेमेंट आणि फायनान्ससाठी वापरली जाते. मात्र, भारतातील लोकांना याची काळजी करण्याची गरज नाही कारण कंपनीने हा निर्णय अमेरिकेसाठी घेतला आहे. (Google Pay app is shutting down in the US after being replaced by Google Wallet)

Google Pay is shutting down in the US in june
Mutual Fund : म्युच्युअल फंड दुपटीने वाढणार ; मालमत्ता १०० लाख कोटींवर जाण्याची अपेक्षा

अहवालानुसार, GPay 4 जून 2024 पासून अमेरिकेत बंद होईल. भारत आणि सिंगापूरमध्ये GPay वापरणाऱ्या लोकांना काळजी करण्याची गरज नाही कारण GPay या देशांमध्ये सुरळीत काम करेल.

कंपनीने एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली की Google Pay ॲपचा अनुभव सुलभ करण्यासाठी, 4 जूनपासून स्टँडअलोन Google Pay ॲपची अमेरिकन आवृत्ती वापरता येणार नाही. अमेरिकेत ही सेवा बंद केली जाईल, मात्र भारत आणि सिंगापूरमध्ये ही सेवा सुरू राहतील.

Google Pay is shutting down in the US in june
Lek Ladki Yojana :‘लेक लाडकी’, ‘सखी’ कागदावरच! ; एकही लाभार्थी अथवा वसतिगृहही नाही

ॲप बंद होणार असल्यामुळे गुगलने पीअर-टू-पीअर पेमेंटही बंद केले आहे. ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अमेरिकेत गुगल पे ॲप बंद झाल्यानंतर अमेरिकन यूजर्स यापुढे ॲपद्वारे इतर लोकांना पैसे पाठवू शकणार नाहीत.

अमेरिकेतील Google Pay वापरकर्त्यांना कंपनीने Google Wallet ॲपवर जाण्याचा सल्ला दिला आहे. गुगलचे म्हणणे आहे की ते आपल्या वापरकर्त्यांना वेळोवेळी अपडेट्स देत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.