Google: गुगल फ्लिपकार्टमध्ये करणार 2,900 कोटींची गुंतवणूक; भारतातील ग्राहकांना होणार मोठा फायदा

Flipkart: गुगल वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये हिस्सा घेण्यासाठी सुमारे 350 दशलक्ष डॉलरची (सुमारे 2,900 कोटी) गुंतवणूक करणार आहे. फ्लिपकार्टने गुगलने केलेल्या गुंतवणुकीची रक्कम उघड केलेली नाही.
Google is buying minority stake in Walmart
Google is buying minority stake in WalmartSakal
Updated on

Flipkart: गुगल वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये हिस्सा घेण्यासाठी सुमारे 350 दशलक्ष डॉलरची (सुमारे 2,900 कोटी) गुंतवणूक करणार आहे. फ्लिपकार्टने गुगलने केलेल्या गुंतवणुकीची रक्कम उघड केलेली नाही किंवा कंपनीच्या मूल्यांकनाबाबतही सांगितलेले नाही.

या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, Google ने हा करार केला कारण फ्लिपकार्ट ही ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीची पायाभूत सुविधा आणि विक्रीची यंत्रणा चांगली आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि जनरेटिव्ह एआय सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आहे.

Google is buying minority stake in Walmart
Ruchir Sharma: महायुतीला बसणार मोठा फटका! ACE इन्व्हेस्टर अन् लेखक रुचिर शर्मा यांचं मोठं भाकीत

Google या डील अंतर्गत फ्लिपकार्टला क्लाउड  (Google Cloud) सेवा पुरवणार आहे. यामुळे कंपनीला व्यवसाय वाढवण्यास मदत होईल. यामुळे देशभरातील ग्राहकांना सेवा देण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यास मदत होईल, असे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.

या रकमेमुळे फ्लिपकार्टला ॲमेझॉन, मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स जिओमार्ट आणि टाटा डिजिटलशी स्पर्धा करण्यासाठी पुरेशी ताकद मिळेल. तसेच कंपनीला देशभरातील, विशेषत: लहान आणि मध्यम शहरे आणि ग्रामीण भारतातील पुढील 20 कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

Google is buying minority stake in Walmart
Adani Ports: विप्रो सेन्सेक्समधून बाहेर; अदानी पोर्ट्सचा 30 कंपन्यांच्या यादीत प्रवेश

2021 नंतर कंपनीने उभारलेली ही मोठी रक्कम आहे. त्या वेळी, फ्लिपकार्ट समूहाने (PhonePe सह) 3.6 अब्ज डॉलर उभे केले होते, ज्यामुळे कंपनीचे मूल्य 37.6 अब्ज डॉलर झाले होते. गुंतवणूकदारांमध्ये सॉफ्टबँकचाही समावेश होता, जी नंतर बाहेर पडली. वॉलमार्टने जुलै 2020 मध्ये फ्लिपकार्टमध्ये 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. यामुळे कंपनीचे मूल्यांकन 24.9 अब्ज डॉलर झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.