Sundar Pichai: ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल सध्या परदेशी टेक कंपन्यांवर टीका करत आहेत. त्यांनी त्यांची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशीही केली. तसेच, ओलाने गुगल मॅप्सची सेवा बंद करून ओला मॅप्स वापरण्यास सुरुवात केली होती. तसेच त्यांनी भारतीय कंपन्यांना सांगितले की ते ओला मॅप्स विनामूल्य वापरू शकतात.
भावीश अग्रवाल यांच्या या हल्ल्यामुळे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मोठा धक्का बसला असून कंपनीने गुगल मॅप्स सेवेची किंमत 70 टक्क्यांनी कमी केली आहे. नवीन किंमत 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
यासोबतच गुगलने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सोबत भागीदारीही जाहीर केली आहे. कंपनीने सांगितले की, ONDC वर काम करणाऱ्या कंपन्यांना 90 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. कंपनीने बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली. तसेच सांगितले की ते भारतीय रुपयांमध्ये पेमेंट देखील स्वीकारेल.
गुगलने बुधवारी सांगितले की, नवीन दराचा लाभ फक्त भारतीय ग्राहकांनाच मिळणार आहे. स्वस्त किमतीचा फायदा फक्त भारतातील लोकच घेऊ शकतात याची कंपनी काटेकोरपणे तपासणी करेल. 1 ऑगस्टपासून त्यांचे बिलिंगही रुपयात सुरू होईल. सध्या, जिओकोडिंग API जे 5 डॉलरच्या दराने उपलब्ध होते, ते आता केवळ 1.50 डॉलरमध्ये उपलब्ध असेल.
भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअप Krutrim द्वारे मॅपिंग आधारित सेवा Ola Maps API लाँच केली होती. तसेच, कंपन्यांना विनंती करण्यात आली होती की ते या सेवा एका वर्षासाठी मोफत वापरू शकतात.
इंडिया फर्स्टला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सेवा सुरू केल्या जातील, असा दावा त्यांनी केला होता. याशिवाय आता फक्त ओला कॅबमध्ये ओला मॅप्सचा वापर केला जात आहे. भाविश अग्रवाल म्हणाले होते की, हे पाऊल उचलल्याने कंपनीला वार्षिक 100 कोटी रुपयांची बचत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.