Unifed Pension Scheme Explained: मोदी सरकारने युनिफाइड पेन्शन योजना आणली आहे. 24 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) ला मंजुरी देण्यात आली. UPS अंतर्गत, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळेल.
आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा (NPS) लाभ मिळत होता. जुनी पेन्शन योजना (OPS) रद्द करून ही योजना 2004 मध्ये आणली गेली. NPS ला प्रचंड विरोध झाला आणि अलीकडच्या काळात OPS परत आणण्याची मागणी होत होती.