Variable Dearness Allowance: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील कामगारांना मोठी भेट देऊन दिवाळी आणखी गोड केली आहे. केंद्र सरकारने कामगारांसाठी परिवर्तनीय महागाई भत्ता म्हणजेच VDA मध्ये सुधारणा केली आहे.
आणि त्यांना देण्यात येणारा किमान वेतन दर 1,035 रुपये प्रतिदिन करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दर महिन्याला कामगारांच्या हातात किती पैसे येतील ते जाणून घेऊया…
गुरुवारी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठी घोषणा केली आणि कामगारांच्या किमान वेतन दरात वाढ केली. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या निर्णयाची माहिती शेअर करताना, कामगार मंत्रालयाने सांगितले की, या निर्णयाचा उद्देश वाढत्या खर्चाच्या दरम्यान कामगारांना मदत करणे आहे.
किमान मजुरीच्या दरातील दुरुस्तीनंतर, बांधकाम, साफसफाई माल उतरवणे यासारख्या अकुशल कामगारांसाठी सेक्टर A मधील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन करण्यात आला आहे आणि त्यानुसार आता त्यांच्या हातात 783 रुपये येणार. म्हणजे दरमहा 20,358 रुपये येणार.
कामगारांच्या विविध श्रेणीनुसार किमान वेतन दरात सरकारने केलेल्या नवीन बदलांनंतर आता अर्धकुशल कामगारांसाठी किमान वेतन दर 868 रुपये प्रतिदिन करण्यात आला असून त्यांना दरमहा 22,568 रुपये मिळणार आहेत. कुशल कामगार, लिपिक आणि नि:शस्त्र वॉचमन किंवा रक्षक यांना त्यांचे किमान वेतन 954 रुपये प्रतिदिन करण्यात आले आहे.
त्यानुसार त्यांचे मासिक मानधन आता 24,804 रुपये प्रति महिना असेल. उच्च कुशल कामगारांना आता दरमहा 26,910 रुपये मिळणार असून, त्यांचे किमान वेतन प्रतिदिन 1035 रुपये करण्यात आले आहे.
कामगारांच्या किमान वेतन दरात वाढ झाल्याची घोषणा केल्यानंतर कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने विशेषतः कामगारांना मदत करण्यासाठी व्हीडीएमध्ये ही दुरुस्ती केली आहे.
कामगारांसाठीचे नवे दर पुढील महिन्याच्या पहिल्या महिन्यापासून, 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील आणि त्यांना एप्रिल 2024 पासून लाभ दिले जातील. या वर्षातील ही दुसरी दुरुस्ती आहे, याआधी एप्रिल महिन्यात हा बदल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.