AC Truck: ट्रकचालकांचा प्रवास होणार सुखकर; केबिनमध्ये एसी बसवणे बंधनकारक, कधी लागू होणार नियम?

AC Truck In India: भारत सरकारने नव्या आदेशात म्हटले आहे की, आता नवीन ट्रकमध्ये एसी बसवणे बंधनकारक असेल.
Government makes air-conditioned truck cabin for drivers mandatory from Oct 2025
Government makes air-conditioned truck cabin for drivers mandatory from Oct 2025 Sakal
Updated on

AC Truck In India: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2025 पासून सर्व ट्रक केबिन अनिवार्यपणे वातानुकूलित (एसी) करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिसूचनाही केंद्रीय मंत्रालयाने जारी केली आहे. 1 ऑक्टोबर 2025 नंतर नवीन ट्रकमध्ये चालकांसाठी एसी केबिनची सुविधा दिली जाईल.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे सांगण्यात आले आहे की 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या वाहनांमध्ये N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनसाठी वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल.

जुलैमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की, ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे.

नितीन गडकरी म्हणाले होते की, ट्रक ड्रायव्हर्स वाहतूक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात, जे भारतासाठी सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि त्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि मानसिक स्थितीशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ट्रकसाठी लवकरच वातानुकूलित केबिन अनिवार्य करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले होते.

Government makes air-conditioned truck cabin for drivers mandatory from Oct 2025
Lookback 2023: जीडीपी वाढ ते शेअर मार्केटचा धडाका, भारतीय अर्थव्यवस्थेने 2023 मध्ये केले अनेक विक्रम

ट्रक चालकांना प्रचंड उष्णतेच्या परिस्थितीत काम करावे लागत असल्याची व्यथा मांडत केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपण ट्रक चालकांसाठी वातानुकूलित केबिनसाठी बराच काळ दबाव टाकत आहोत, तर काहींनी यावर आक्षेप घेतले होते.

रस्ते वाहतूक मंत्रालयाने 2016 मध्ये पहिल्यांदा हे सुचवले होते. नितीन गडकरी म्हणाले होते की, 'आपल्या देशात काही चालक 12 किंवा 14 तास ट्रकवर असतात, तर इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालक किती तास ड्युटीवर असू शकतात यावर निर्बंध आहे.

Government makes air-conditioned truck cabin for drivers mandatory from Oct 2025
Coca-Cola India: कोका-कोलाची अल्कोहोल क्षेत्रात एन्ट्री; महाराष्ट्र अन् गोव्यात करणार मोठी चाचणी

आमचे चालक 43 ते 47 अंश तापमानात गाडी चालवतात आणि आपण चालकांच्या स्थितीची कल्पना केली पाहिजे. मी मंत्री झाल्यानंतर एसी केबिन सुरू करण्यास उत्सुक होतो. मात्र त्यामुळे खर्च वाढणार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध केला. मी फाईलवर सही केली आहे की सर्व ट्रक केबिन एसी केबिन असतील. असा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.